Home महाराष्ट्र बारामती मॅरेथॉन प्रेरणादायी उपक्रम – मकरंद पाटील

बारामती मॅरेथॉन प्रेरणादायी उपक्रम – मकरंद पाटील

बारामती पॉवर मॅरेथॉनमध्ये ५ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
बारामती
बारामती पॉवर मॅरेथॉन हा केवळ एक क्रीडा उपक्रम नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीचा उत्सव आणि सामूहिक एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.
मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते बारामती स्पोर्ट फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित बारामती पॉवर मॅरेथॉनला झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी खाजगी सचिव विकास ढाकणे, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील मुसळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, एमआयडीसी बारामतीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजक सतीश ननावरे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी मरेथॉनचे आयोजक आणि सहभागी धावपटूंना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, बारामतीने क्रीडाक्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे आणि अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला नवचैतन्य मिळते, या निमित्ताने बारामतीमध्ये उत्साह, जोश आणि ऊर्जेचा संगम अनुभवायला मिळाला, असेही श्री. पाटील म्हणाले.
मुख्य स्पर्धेत ४२.२ किमी फुल मॅरेथॉन, २१.१ किमी हाफ मॅरेथॉन, १० किमी रन आणि ५ किमी फन रन अशा चार गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. बारामती पॉवर मॅरेथॉन सिझन-३ मध्ये ५ हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग घेतला; विभागनिहाय मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे*
*४२.२ किमी-महिला गट*
१.आरती जानवर – वय गट: ४० ते ४९ वर्षे महिला – वेळ: ०३:५०:३७
२.राजनी सिंग – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०३:५१:३७
३. सिंधू उमेश – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०३:५४:५५
*४२.२ किमी-पुरुष गट*
१.बबलू पाटिंग चव्हाण – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ०२:४२:२५
२. प्रदीप केरकेट्टा – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०२:५०:१६
३. योगेश सानप – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०३:०१:००
*२१.१ किमी-महिला गट*
१. प्रियांका दादाजी देोरे – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ०१:३५:२०
२. अभिलाषा मोडेकर – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०१:४२:३०
३. सौम्या पिल्लई – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०१:४६:५६
*२१.१ किमी-पुरुष गट*
१. विशाल विष्णू कंबिरे – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०१:११:१६
२. लेट चांगदेव हिरामन – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०१:११:५२
३. सुजल सोमनाथ सावत – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ०१:२०:२५
*१० किमी-महिला गट*
१. सुरेखा रामा माताणे – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ००:४१:५२
२. रोशनी भूषण निशाद – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ००:४४:१४
३. काजल भालचंद्र यादव – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ००:५१:३३
*१० किमी-पुरुष गट*
१. देशराज मीणा – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ००:३५:०५
२. कुनाल जाधव – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ००:३६:३३
३. गौरव पवार – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ००:३७:०८
स्पर्धेतील ठळक बाबी
■ नागपूर येथील सात वर्षांची कुमारी आर्या पंकज टाकोणे हिने ५ किमी धाव २५ मिनिटांत पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात आला.
■ उपमुख्यमंत्री यांचे खासगी सचिव डॉ. अमर भडंगे, क्रीडा मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील आगरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.
समारोपाप्रसंगी विजेत्या धावपटूला पारितोषिक वितरण करण्यात आले
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00