Home पिंपरी चिंचवड गुरूवारी शहरात होणार जन आक्रोश धरणे आंदोलन

गुरूवारी शहरात होणार जन आक्रोश धरणे आंदोलन

तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात राजकीय पक्ष व पुरोगामी संघटना होणार सहभागी

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी चिंचवड
महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्था ढासळली असून गुंडगिरी वाढली आहे.बलात्कार, खून,दरोडे,धमकावणे,खंडणीचे प्रमाण वाढले आहे.हे रोखण्यासाठी राज्य सरकार व गृह विभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहे.बीड जिल्ह्य़ातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सर्व गुन्हेगारांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.गुन्ह्याचा तपास  नीट होत नसून याचे सूत्रधार अजून ही मोकाट आहेत भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची एका तरुणाकडून विटंबना करण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभागी सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाची परभणी येथे कोठडीत हत्या झाली.
या हत्येत सहभागी पोलिसांवर अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही. राजगुरुनगर येथे भटक्या विमुक्त समाजातील दोन अल्पवयीन मुलीवर झालेले लैंगिक अत्याचार व हत्या तसेच पवनानगर येथे अल्पवयीन मुलीवर पोलीसाने केलेले लैंगिक अत्याचार या माणूसकीला काळीमा लावणार्‍या घटना घडल्या आहेत राज्यात गुंडगिरी वाढली असून गृह विभाग अपयशी ठरला आहे राज्यातील जनता संतप्त झाली आहे राज्यातील विविध जिल्ह्यात मोर्चे निषेध सभा व आंदोलने होत आहेत. तरीही सरकार गांभीर्यपूर्वक कारवाई करत नाही.याचा निषेध करण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक ९ जानेवारी रोजी दुपारी ११ ते १ या वेळेत पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालयासमोर जन आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात शहरातील राजकीय पक्ष व पुरोगामी संघटना सहभागी होणार आहेत. आपल्या हक्क व अधिकारासाठी संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळावा सर्व आरोपींना फाशी व्हावी राज्यात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे चिंचवड येथे आज मंगळवार रोजी झालेल्या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे शिवसेना ऊबाठाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते आम आदमी पक्षाच्या शहराध्यक्षा मीना जावळे स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे मराठा क्रांती मोर्चाचे नकुल भोईर, मीरा कदम,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार,राष्ट्रीय काँग्रेसचे विश्वनाथ जगताप,ज्ञानेश्वर मलशेटटी,बारा बलुतेदार संघाचे प्रताप गुरव,शिवशाही युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे,संविधान जनजागर अभियानचे विष्णू मांजरे,सागर चिंचवडे,विशाल मिठे,किशोर तेलंग यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00