Home पुणे साताऱ्यात १०, ११ व १२ जानेवारीस ‘शोध मराठी मनाचा’ जागतिक संमेलन

साताऱ्यात १०, ११ व १२ जानेवारीस ‘शोध मराठी मनाचा’ जागतिक संमेलन

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

सातारा

  येथील रयत शिक्षण संस्था व जागतिक मराठी अकादमी या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १० जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या तीन दिवशी  शोध मराठी मनाचा या २० व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे करण्यात आलेले आहे. हे  संमेलन  महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. . . साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात शुक्रवार, दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.००  वाजता या संमेलनाचे उदघाटनरयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरद पवार यांचे हस्ते होणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून मा. ना. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मा. ना. आशिष शेलार हे मान्यवर उपस्थित राहणार असून मा. श्रीनिवास पाटील, मा. यशवंतराव गडाख पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर, मा. पी. डी. पाटील, मा. आमदार विश्वजीत कदम, मा. दत्तप्रसाद दाभोकर आणि मा. नागराज मंजुळे उपस्थित राहतील. यावेळी हणमंतराव गायकवाड यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार व जेष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांना जागतिक मराठी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच जपानहून योगी पुराणिक व अमेरिका येथून श्री. ठाणेदार यांचे व्हीडीओद्वारे संदेश प्रसारित केले जाणार आहेत. या संमेलनास चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, उद्योग, कृषी, शिक्षण व आरोग्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे परदेशातील मराठी व भारतीय मान्यवर सहभागी होत असल्याची माहिती  जागतिक संमेलनाचे निमंत्रक व स्वागताध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी व जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शोध मराठी मनाचा २०२५ जागतिक संमेलनातील तीन दिवसाच्या विविध कार्यक्रमाच्याविषयी सविस्तर माहिती देताना ते पुढे म्हणाले की, ‘शुक्रवार  १० जानेवारी रोजी दुपारी १.०० ते २.०० या कालावधीत रयत शिक्षण संस्थेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत व प्रा. संभाजी पाटील प्रस्तुत असा कर्मवीर भाऊराव पाटील चरित्र आशयावर आधारित ‘गीत गंधाली’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत ‘लक्ष्मीची पाऊले या कार्यक्रमात उद्योगक्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती हणमंतराव गायकवाड, फारूक कुपर व रामदास माने यांची मुलाखत घेतली जाणार आहे. तर दुपारी ३.०० वाजता ‘समुद्रापलीकडे या कार्यक्रमात परदेशस्थित कर्तृत्ववान मराठी व भारतीय व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या जातील. अमेरिकेतील गिरीश ठकार, प्राजक्ता वझे, अनिल नेरूरकर, प्रसाद वझे, ऑस्ट्रेलिया येथील नॅप अल्मेडा, मिहीर शिंदे, दुबईतील सचिन जोशी इत्यादी मान्यवर यांची मुलाखत घेतली जाणार आहे.

शनिवारी ११ जानेवारीस सकाळी ९.३० वाजता ‘मुक्काम पोस्ट सातारा’ या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील मराठी कलावंत अभिनेते सयाजी शिंदे, किरण माने व संतोष पाटील व इतर कलावंतांच्या मुलाखती होतील. सकाळी ११.०० वाजता ‘अभिजात मराठी आणि माध्यमे’ या विषयावरील परिसंवादात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नितीन ठाकरे (नाशिक), रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी, जगन्नाथ पाटील (बंगलोर), मसापचे विनोद कुलकर्णी इत्यादी सहभागी होतील. दुपारी १२.०० वाजता ‘मुक्त संवाद’ या कार्यक्रमात मा. ना. उदय सामंत सहभागी होतील. दुपारी २.३० वाजता ‘आकाशाशी जडले नाते’ या कार्यक्रमात खर्डा – अहिल्यानगर येथील वैमानिक नीलम इंगळे व अमेरिकेतील आमोद केळकर यांच्या मुलाखती होतील. दुपारी ३.०० वाजता आधारवड या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाज कार्यकर्ते डॉ. भरत केळकर (नाशिक), गिरीश कुलकर्णी (अहिल्यानगर) व डॉ. विश्वास सापत्नेकर (लंडन ) इत्यादींच्या मुलाखती होतील.  सायंकाळी ५.०० वाजता ‘चित्र -शिल्प –काव्य या कार्यक्रमात शिल्पकार मंदार लोहार (सातारा), चित्रकार सचिन खरात (सोलापूर), यांचेसोबत कवी फ. मु. शिंदे (संभाजी नगर), विठ्ठल वाघ (अकोला), अशोक नायगावकर (वाई), नितीन देशमुख (चांदूरबाजार), मीनाक्षी पाटील (मुंबई), अंजली कुलकर्णी (पुणे), वैशाली पतंगे (कुंभारगाव), अमेरिकेतील भूषण कुलकर्णी, प्रसन्न शानबाग, श्रद्धा भट, योगेश नेर, तसेच कॅनडा येथील समीर जिरांकलगीकर इत्यादी मान्यवर सहभागी होतील. या कार्यक्रमात तिन्ही कलांचा सुंदर आविष्कार एकत्रित होत असल्याने त्याचे वेगळेपण भावणारे असेल. त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता ‘सांस्कृतिक कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे.

रविवारी १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता ‘कृत्रिम बुद्धिमता (AI) व सायबर सुरक्षा या कार्यक्रमात विवेक सावंत (पुणे), मंगेश आमले (मुंबई) व अमेरिकेचे रवींद्र हिरोळीकर (अमेरिका) हे सहभागी होतील. सकाळी ११.०० वाजता ‘रुपया, डॉलर व बिटकॉईन या कार्यक्रमात अर्थ विचारावर विद्याधर अनास्कर (पुणे), डॉ. नीरज हातेकर (वाई) व जयंत साळगावकर (मुंबई) यांच्या मुलाखती होतील. १२ जानेवारीस दुपारी १२.०० वाजता ‘समारोप समारंभास प्रमुख अतिथी म्हणून संसद सदस्य मा. खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले व पर्यटन, खाणकाम व माजी सैनिक कल्याण मंत्री मा. ना. शंभूराजे देसाई उपस्थित राहणार आहेत. या शिवाय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व मंत्री यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेले असून त्यांच्या उपस्थितीनुसार कार्यक्रमात थोडाफार बदल होण्याची शक्यता असल्याचे संमेलन निमंत्रक व जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी सांगितले. या संमेलनासाठी कार्यक्रम स्थळी ३५०० खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या संमेलनात परिसरातील नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनिंनी सहभागी होऊन विविध विषयावरील ज्ञान, माहिती व प्रेरणा घ्यावी असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकात दळवी यांनी यावेळी केले आहे.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00