Home पिंपरी चिंचवड गॅस सिलिंडर पुरवठा मुबलक, विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका – आमदार शंकर जगताप

गॅस सिलिंडर पुरवठा मुबलक, विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका – आमदार शंकर जगताप

आमदार शंकर जगताप यांची अन्नपुरवठा परिमंडल अधिकाऱ्यांसोबत बैठक

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वावड्या उठल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणा हलवून अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. “शहरात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत आहे, त्यामुळे नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात गॅस टंचाई असल्याच्या चर्चांमुळे गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते. काही ठिकाणी गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार शंकर जगताप यांनी अन्न पुरवठा परिमंडळ अधिकारी विजयकुमार क्षीरसागर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली.

या बैठकीत आमदारांनी शहरातील गॅस पुरवठ्याची सद्यस्थिती, साठवणूक आणि वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. “नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत असेल किंवा गॅसचा काळाबाजार होत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. गॅस सिलिंडरचा तुटवडा भासणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

प्रशासनाकडून स्पष्टीकरण

यावेळी अन्नपुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर यांनी माहिती दिली की, शासनाने आखून दिलेल्या गाईडलाईननुसार पुरवठा सुरू आहे. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष ‘गस्त पथके’ तैनात करण्यात आली असून ठिकठिकाणी अचानक तपासणी केली जात आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरचे वितरण योग्य पद्धतीने होत आहे की नाही, यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. शहरात गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

“आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पिंपरी चिंचवड शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत.  अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला असून, शहरात गॅस सिलिंडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. प्रशासनाला काळाबाजार रोखण्यासाठी कडक सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि अनावश्यक साठवणूक करून घाबरून जाऊ नये. आपला गॅस पुरवठा पूर्णतः सुरळीत आहे.”

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00