Home पिंपरी चिंचवड पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबत मनोधैर्य वाढविण्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भर – आमदार शंकर जगताप

पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबत मनोधैर्य वाढविण्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भर – आमदार शंकर जगताप

पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी...

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

 पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी पवनाथडी जत्रा हे एक मोठे व्यासपीठ ठरले आहे. जत्रेत सहभागी असलेल्या स्टॉलधारक महिलांनी आपला व्यवहार डिजिटल पद्धतीने करावाज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासोबतच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भर देत आहे. पिंपरी चिंचवड शहरात भविष्यात महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती कशी करता येईलयासाठी महापालिका निश्चितच पुढाकार घेईलअसे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

 महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिनांक २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबरसत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळेविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरमाजी महापौर शकुंतला धराडे,नगरसदस्य शत्रुघ्न काटेअभिषेक बारणेशाम जगताप,कुणाल व्हावळकरधर्मपाल तंतरपाळेज्ञानेश्वर उर्फ माऊली जगतापबाबासाहेब त्रिभुवन,संजय काटेप्रभाकर वाघेरेतानाजी बारणेनगरसदस्या तृप्ती कांबळेउज्वला ढोरे,अनुराधा गोरखे,आरती चौंधे,मनिषा पवारसुषमा तनपुरे,दिप्ती कांबळे,पल्लवी जगतापनिता पाडाळे,सुप्रिया चांदगुडेनीता जगतापसारिका मासुळकर,रविना आंगोळकर,योगिता नागरगोजेकुंदा भिसे,अनिता काटे,सविता खुळे,दिप्ती कांबळे,अर्चना तापकीरमहापौर यांच्या पत्नी श्रध्दा लांडगेतसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोरविक्रांत बगाडेसमाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदेउप आयुक्त सिताराम बहुरे,संदीप खोत,अर्चना केरूरेमहापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी,विविध विभागातील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त ममता शिंदे यांनी तर सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. उपस्थितांचे आभार महिला व बालकल्याण समितीच्या राणी पठारे यांनी मानले.

यानंतर सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा मराठी बाणा’ या सांस्कृतिक कार्यक्रमालाही नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी  पवनाथडी जत्रेचे आयोजन सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे करण्यात येते. यंदाही याच मैदानावर पवनाथडी जत्रा भरविण्यात आली आहे. या जत्रेत ८०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून, महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची चव जपणारे शाकाहारी व मांसाहारी यांसह पारंपरिक पदार्थही येथे उपलब्ध आहेत. तसेच नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील चार दिवस या जत्रेमध्ये महिलांनी तयार केलेली उत्पादने व विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असणार असून, सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.पवनाथडी जत्रा सर्वांसाठी खुली असून प्रवेश विनामूल्य आहे.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00