55
चिखली
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजन व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे राबवीत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन या उपक्रमाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले की राज्यातील नागरिकांना केंद्रभूत ठेवून राज्य सरकार काम करत आहे. शासनाने जनतेला उत्तरदायी असले पाहिजे व प्रशासन त्यासाठी तयार असणे आवश्यक आहे पिंपरी चिंचवड महापालिका तयार करत असलेला सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन उपक्रम हा याचा भाग आहे.
मुख्यमंत्र्यांनी महापालिकेने तयार केलेल्या अनधिकृत होर्डिंग वर लक्ष ठेवणाऱ्या ए आय प्रणालीचे सुद्धा कौतुक केले.
Please follow and like us:
