Home पिंपरी चिंचवड आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट

आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट

 राज्य शासनाक़डून विविध कामांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
 वाकड, पुनावळे,मामुर्डी आणि किवळे या गावांसाठी अधिकचा निधी

पिंपरी

चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाकडून राबविलेल्या जाणा-या विविध योजनांमधून सुमारे १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मतदारसंघातील नागरिकांच्या सेवा-सुविधांशी निगडीत कामे होणार आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने एकप्रकारे हे चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट मिळाले असून हा शासन निधी पिंपरी-चिंचवड शहरासोबतच विशेषतः वाकड, पुनावळे,मामुर्डी आणि किवळे या झपाट्याने वाढणाऱ्या भागाला अधिकचा निधी देऊन तेथील विकासाला हातभार लागला आहे.

राज्यातील महायुती सरकार विकासाचे उदिष्ट साध्य करणारे व जनतेच्या मनातील आशा-आकांक्षा पूर्ण करणारे आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शंकर जगताप यांच्याकडून सातत्याने शासनाच्या माध्यमातून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून दिवाळी सणाच्या पुर्वसंध्येला शासनाकडून चिंचवड विधानसभेतील अनेक कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला.

महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गंत चार महत्वकांक्षी कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रावेत येथे सुसज्ज बहुउद्देशीय इमारत बांधणे, मामुर्डी येथील मनपाच्या जागेत क्रीडासंकुल उभारणे, वाकड वेणूनगर येथे क्रीडा संकुल उभारणे, किवळे येथीलजागेत राष्ट्रीय दर्जाचे भारतरत्न उद्यान विस्तारीकरण करणे या मोठ्य़ा कामांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये वाकडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सभागृह बांधणे, क्रीडासंकुल उभारणे. जलतरण तलाव बांधणे, टेनिस कोर्ट तयार करणे, तसेच पुनावळेमध्ये सभागृह, वाचनालय, विरंगुळा केंद्र बांधणे आणि सांगवी परिसरात विविध सुशोभिकरणाच्या कामांचा समावेश आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गंत १४ कामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी २० लाख रुपयांचा निधी या कामांसाठी उपलब्ध देखील करून देण्यात आलेला आहे. या अंतर्गंत किवळे एमबी कॅम्प झोपडपट्टीत पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन टाकणे, वाचनालय उभारणे, काँक्रिटीकरण करणे, सभा मंडप बांधणे, तसेच नागसेन नगर झोपडपट्टी येथे वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करणे, नवीन स्वच्छतागृह उभारणे, पिंपळे गुरव लक्ष्मीनगर येथे बुद्धविहाराचे सीमाभित व विहारात अभ्यासिका तयार करणे, वेताळनगर झोपडपट्टी बौद्ध विहार परिसरात विविध कामे करणे, थेरगाव जगतापनगर येथील दलितवस्ती परिसरात ड्रेनेज लाईन टाकणे आणि राजीव गांधीनगर पिंपळे गुरव झोपडपट्टीत ड्रेनेज लाईन टाकणे या कामांचा समावेश आहे.

“वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांची गरज प्रचंड वाढली आहे. शासनाकडून मंजूर झालेला हा १२ कोटींचा निधी म्हणजे विकसित आणि स्मार्ट चिंचवड मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. विशेषतः वाकड, पुनावळे, रावेत, मामुर्डी आणि किवळे या झपाट्याने विकसित होत असलेल्या भागातील नागरिकांना या कामांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ होईल. खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांसाठी निर्माण होणारी नवीन केंद्रे ही आरोग्यदायी, सशक्त आणि विकसित चिंचवडच्या’ निर्मितीकडे एक ठोस पाऊल आहे. शासन निधीचा योग्य वापर करून प्रत्येक नागरिकापर्यंत विकास पोहोचवणे, हेच आमचे ध्येय आहे.”
 शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00