पिंपरी चिंचवड
वरील उपरोक्त विषयान्वये पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून शहराचे कार्यक्षेत्र वाढतच आहे, कामगारनगरी आणि उद्योगांची पंढरी असलेले आपले शहर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून येणाऱ्या कामगार बांधव आणि नागरिकांच्या सोबतच परराज्यातून म्हणजेच ( नेपाळ, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, बिहार,मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, प.बंगाल, कलकत्ता आणि इतर) येथून कामाच्या, नोकरीच्या निमित्ताने आपल्या शहरात स्थायिक होत आहे. पोलिस प्रशासन च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदरच्या व्यक्तींना भाडेकरू म्हणून ठेवत असताना भाडेकरूंची नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. मात्र सध्या पोलिस प्रशासन आणि घरमालकांची अनास्था यातून १००% नोंदणी झालीच आहे हे कुणीही ठामपणे सांगू शकणार नाही. कारण या नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत त्या मुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.
तरी महाराष्ट्रातील जिल्ह्यामधून आलेला प्रत्येक नागरिकांसाठी इथे हाताला काम आहे, नोकरी आहे. वर्षानुवर्षे पै पै जमा करत त्यांनी स्वतःचे स्वप्नातले घर बांधले आहे . आणि आता ते इथलेच या पिंपरी चिंचवड शहराचे नागरिक झाले आहेत.मात्र शहराच्या सुरक्षेबाबत अजून ही पालिका प्रशासन म्हणून आपला हलगर्जीपणा एक ना एक दिवस शहराला संकटाच्या खाईत नेहु शकतो. म्हणूनच पालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी समन्वय साधत परराज्यातून कामासाठी, व्यवसायासाठी अथवा नोकरीसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला नाममात्र शुल्क भरून वर्क परमिट क्रमप्राप्त करण्यात यावे.
या शहरावर पहिला हक्क इथल्या स्थानिक भूमिपुत्रासोबतच इथे कायमस्वरूपी नागरिक म्हणून राहणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांचा हक्क आहे. इतरांना देखील रोजी रोटी कमविण्यासाठी या शहराने कधीही परके समजले नाही. मात्र नजिकच्या काळातल्या काही घटना, गुन्हेगारीचा आलेख पाहता इतर राज्यातून आणलेले कामगार मग ते औद्योगिक क्षेत्र असो वा हॉटेल व्यवसाय, मजुरी काम असो अथवा कुशल कामगार क्षेत्र असो सर्व परराज्यातील कामगारांना शहराच्या दृष्टीने वर्क परमिट घेणे बंधनकारक करावे. या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत आलेल्या नागरिकांचे अनधिकृत रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड काढणाऱ्या वृत्तींनां देखील आळा बसणार आहे, हे जर वेळीच रोखले गेले नाही तर शहर सुरक्षेच्या दृष्टीने आपण गांभीर्याने पाहत नाही असाच अर्थ निघतो तरी अशी माझी मागणी आहे की आपण याबाबत कडक उपाययोजना कराव्यात.
गेल्याच आठवड्यात सांगवी येथील एका घरात बेकायदेशीर रित्या म्यानमार मधील नागरिक राहत असलेल्याचे आढळून आले. पोलिस प्रशासन याबाबत योग्य ती कारवाई करेलच मात्र पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने परराज्यातून येणारा प्रत्येक कामगार अथवा नागरिक हा या शहरात वर्क परमिट घेऊनच काम करेल जेणेकरून व्यवस्थेवर येणारा ताण व पोलिस प्रशासन यांच्या कामात सुलभता येईल. ज्या ज्या व्यवसायांना परराज्यातील कामगारांची गरज आहे. त्या त्या व्यवसायाच्या मूळ मालकांना देखील सदरच्या कामगारांचे वर्क परमिट घेणे बंधनकारक करावे ही गरज आहे.
पालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांच्या समन्वयातून परराज्यातून आलेला प्रत्येक नागरिक यांचे या ठिकाणी वर्क परमिट सोबतच चरित्र पडताळणी देखील सहजरित्या होणार असून या प्रक्रियेमध्ये शहरातील एकूण शहराचे नागरिक आणि अनिश्चित काळासाठी परराज्यातून आलेली कामगार नागरिकांची संख्या लक्षात येणार आहे. तरी आपण याबाबत उचित कडक नियमावली बनवून शहरातील सुरक्षेच्या प्रश्नावर योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती,
कळावे,
