8
पिंपरी
पिंपरी–चिंचवड भूलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. उमा देशमुख यांची निवड करण्यात आली. आकुर्डी येथे संपन्न झालेल्या पदग्रहण कार्यक्रमात अध्यक्ष पदाची सूत्रे मावळते अध्यक्ष डॉ. भावेश शेठ यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. उमा देशमुख यांच्याकडे सोपवली. सचिवपदी डॉ. छाया सूर्यवंशी, सह सचिव डॉ भाविनी शहा, उपाध्यक्षपदी डॉ दीपक शिंदे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी डॉ. सीमा सूर्यवंशी तर खजिनदार डॉ. बागेश्री वाबळे, सहखजिनदार पदी डॉ मयुरेश उमाळकर यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला महाराष्ट्र भूलशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोसले, उपाध्यक्ष डॉ. विकास कर्णे, पुणे गव्हर्निंग कौन्सिल मेंबर डॉ. कल्याणी पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुमित लाड,सचिव डॉ. माया भालेराव, संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत नानकर, डॉ शोभा व्हटकर,डॉ. शुभांगी कोठारी, डॉ. रत्नदीप मार्कंडेय, डॉ. स्मिता कुलकर्णी, डॉ. शोभा जोशी, डॉ शिल्पा गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी राज्यस्तरीय परिषदेत संघटनेने पाच पारितोषिके मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. युवा भूलतज्ज्ञांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष परिषदेचे नियोजन डॉ. सचिन वाघ व डॉ. अशिष पटणी यांनी प्रभावीपणे केले. या
भुलीतील गुंतागुंतीतून निर्माण होणार्या धोक्यापासून रुग्णाचे संरक्षण करणारे
डॅनट्रोलिन हे दुर्मीळ औषध उपलब्ध कसे करता येईल, याबाबत मार्गदर्शन करणारे परिपत्रक उपस्थितांना देण्यात आले
यावेळी डॉ. मनीषा सपाटे व डॉ. अर्चना शेलमोहकर संपादित भूलतज्ञ शाखेच्या *पल्स* या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र भूलतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोसले यांनी *शारीरिक तंदुरुस्ती व निरोगी जीवनशैली* याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी संघटनेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी–चिंचवड भूलतज्ज्ञ संघटनेने वर्षभर राबविलेल्या उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. विशेष उल्लेखनीय म्हणजे नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिक – जीवनरक्षक* या उपक्रमाला विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नीलावती कासनाळे व डॉ अदिती येलमार यांनी तर डॉ छाया सुर्यवंशी यांनी आभार मानले.
डावीकडून- डॉ बागेश्री वाबळे,डॉ माया भालेराव,डॉ विकास कर्णे, डॉ अविनाश भोसले,डॉ भावेश शेठ, डॉ उमा देशमुख, डॉ छाया सूर्यवंशी, डॉ सीमा सूर्यवंशी,डॉ दीपक शिंदे आदी
Please follow and like us:
