15
नांदेड
आपल्या भारत देशाच्या आंतरिक्ष सुरक्षा संरक्षणासाठी खूप मोठे योगदान देवून अनेक मिसाईल अस्त्र बनवून जगात भारत देशाचे नाव उंचावून आखरी श्वासापर्यंत भारत देशासाठी कार्य करणारे महान शास्त्रज्ञ म्हणजेच मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे होत, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.15 ऑक्टोबर 2025 बुधवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारताचे अकरावे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची 94 वी जयंती वाचक प्रेरणा दिन व जगतिक विद्यार्थी दिन, भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करणयात आली.
या अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सर्वप्रथम लेखा परिक्षण अधिकारी मा.श्री.संतोष शिंगने यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी अस्त्र अग्नी -1, अग्नी-2, अग्नी-3, आकाश, नाग, त्रिशूल या क्षेपाणास्त्रांची निर्मिती केली. ते इस्त्रोचे महान वैज्ञानिक होते. अशा या महान विभूतीचा आपण सर्वांनीच आदर्श घेवून समाजाप्रती-देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची नित्तांत गरज आहे, असेही ते शेवटी यावेळी म्हणाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय वाहतुक अधिक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे, लेखापरिक्षण अधिकारी संतोष शिंगने, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विष्णू हरकळ, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, चार्जमन संदीप बोधनकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, पाळी प्रमुख कैलास वाघमारे, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, सौ.सुनिता हुंबे, शिवचरण मळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रापम आगारातील कष्टकरी कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
Please follow and like us:
