15
नांदेड
सकल आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी या आदिवासी जमातींच्यावतीने आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी येणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर राज्यस्तरीय महामोर्चात जमात बांधवांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समाजाचे ज्येष्ठ नेते नागनाथरावजी घिसेवाड यांनी केले. दि. 26 ऑक्टोबर 2025 रविवार रोजी हॉटेल राजयोग गणराज पॅलेस नमस्कार चौक नांदेड येथे सकाळी ठिक 11 वाजता आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरा कोळी जमातीतील कर्मचारी कार्यकर्ते यांचा गौरव सोहळा तथा नागपूर येथील हिवाळी अधिवेशन महामोर्चाच्या संदर्भाने पुर्व तयारी मार्गदर्शन व सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी ते अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी समाजाचे गाढे अभ्यासक तथा ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ सुरवसे सोलापूर, बाळासाहेब बळवंतकर पंढरपुर, परमेश्वर गोणारे, गिरीधारी मोळके, उद्योजक शशिकांतअण्णा भुसेवाड, मारोतीमामा मामीलवाड, आनंदा रेजीतवाड, केरबा जेठेवाड, वसंतराव कलंबरकर, केशवराव कुकूलवाड, सौ.विद्या पाटील, गुणवंत एच.मिसलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वसंतराव कलंबरकर, श्रीनिवास रोयलावार, गंगाप्रसाद मुदीराज, गोविंदराज सुर्यवंशी, गिरीधारी मोळके, माधवराव रेडेवाड बरबडेकर यांचा सन्मानचिन्ह, शाल, पुष्पहार व गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी या महामोर्चाचे मुख्य आयोजक दत्ताभाऊ सुरवसे व बाळासाहेब बळवंतकर यांनी सभेला मार्गदर्शन करतांना म्हणाले की, हा मोर्चा न्याय हक्क मागण्यासाठी अंत्यस्थ लढा असेल. जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सरकार जोपर्यंत ठोस निर्णय घेणार नाही, तोपर्यंत या महामोर्चाचे रूपांतर आमरण उपोषण व धरणे आंदोलनात रूपांतर होईल, असे प्रतिपादन केले. यावेळी विचारपीठावरील सर्व मान्यवरांची समयोचित मोर्चाच्या संदर्भाने भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादाराव कोठेवाड यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर मरकंटे व माधव रेडेवाड यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मारोती बिचेवाड, सुनिल मुदिराज, गंगाधर अनपलवाड, संजय यलमवाड, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, लक्ष्मणराव नागरवाड, शंकरराव तमवाड, डॉ.भगवान गुंजलवाड, डॉ.बालाजी अदमपूरकर, इंजि.प्रमोद बुक्कावार, दादाराव कोठेवाड, रावसाहेब पल्लेवाड, प्रा.ज्ञानेश्वर मरकंटे, लक्ष्मण जंगेवाड, रमेश यमलवाड, शंकर रोडेवाड, सुभाष मद्देवाड, राजू पिंगळवाड, दिनेश उलगुलवाड, उत्तम पुठेवाड, संदीप सोमेवाड, के.वाय.उलगुलवाड, गजानन सोमेवार, मारोती रूद्रवार, पंढरी बोंडलवाड, बालाजी चालखुरे, ॲड.जगताप पिल्लेवाड, विठ्ठलराव पिंजेवाड, बालाजी चिकटवाड, दत्तरामजी चिंतलवाड, जगजीवन सुदेवाड, राजू मदेवाड, गजानन इर्लेवाड, लक्ष्मणराव दोनतुलवाड, पत्रकार गंगाधर जुकूलवार, सुभाष कांबळे, महेश राऊत, गितेश बोटलेवाड, जे.के.चिंतल इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
Please follow and like us:
