12
उरण
शब्दांच्या शस्त्राने सत्ताधाऱ्यांना नेहमीच प्रश्न विचारणारे साप्ताहिक झुंजार मत चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार अजित पाटील आता राजकारणाच्या रणांगणात उतरले आहेत. उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी पाटील यांची निवड नुकतीच करण्यात आली.
रानसई येथे झालेल्या उरण-पनवेल तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या समन्वय बैठकीत जिल्हाध्यक्ष सुधाकरभाऊ घारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी कार्याध्यक्ष अशोकराव भोपतराव, प्रदेश चिटणीस मनोज भगत, कोकण संघटक रूपेश पाटील, तालुका अध्यक्ष परिक्षीत ठाकूर, तसेच तेजस डाकी आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा सरचिटणीस दिपक माळी, रायगड जिल्हा उपाध्यक्ष भूषण ठाकूर, उरण तालुका ओबीसी सेल अध्यक्ष मच्छिंद्रनाथ ठाकूर, रायगड जिल्हा सरचिटणीस रमण कासकर, उरण विधानसभा सरचिटणीस निलेश पाटील यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या.
कार्यक्रमादरम्यान पनवेल तालुक्यातील उबाठा सेनेचे उपतालुकाप्रमुख विठ्ठल मुंगाजी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष घारे यांच्या हस्ते पक्षाचा उपरणा देऊन करण्यात आले.
या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष घारे म्हणाले, “आगामी निवडणुकीसाठी अजून कोणत्याही युतीचा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या प्रत्येक वॉर्डात व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवावी.”
बैठकीत संतोष ठाकूर, परिक्षीत ठाकूर, रमण कासकर, तेजस डाकी, रूपेश पाटील यांनीही मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन मनोज भगत यांनी केले.
Please follow and like us:
