14
पुणे
भारतातील अग्रगण्य परदेश शिक्षण सल्लागार संस्था स्टडी स्मार्ट तर्फे ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२५ शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत पोचा हॉल, बोट क्लब, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हा कार्यक्रम एकाच छताखाली संपूर्ण मार्गदर्शन देणारा ठरणार असून प्रवेश विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मोफत आहे.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्टडी स्मार्टचे व्यवस्थापकीय संचालक चेतन जैन म्हणाले की, बारावी किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर हजारो विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगतात; मात्र योग्य विद्यापीठाची निवड, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती, आर्थिक नियोजन आणि राहण्याची सोय याबाबत अनेकांना संभ्रम असतो. ग्लोबल एज्युकेशन फेअर या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विशेष रचण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांना यूके, यूएसए, आयर्लंड, जर्मनी, दुबईसह विविध देशांतील ६० हून अधिक नामांकित विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधता येणार आहे.
या फेअरमध्ये शिष्यवृत्ती, आर्थिक मदत योजना, जानेवारी व सप्टेंबर २०२६ प्रवेश संधी, स्पॉट ऑफर्स, IELTS वेव्हर्स, तसेच परदेशात शिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन करणाऱ्या इंटरॅक्टिव्ह वर्कशॉप्स आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय, स्टडी स्मार्टचे तज्ज्ञ काउन्सेलर्स प्रत्यक्ष एक-एक विद्यार्थ्यांना व पालकांना वैयक्तिक मार्गदर्शन करतील, ज्यामुळे अचूक व प्रत्यक्ष माहिती मिळून योग्य निर्णय घेता येईल.
विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी करिअर काउन्सेलिंग, शैक्षणिक कर्ज, निवासव्यवस्था, फॉरेक्स व प्रवास सहाय्य यांसाठी स्वतंत्र डेस्क्स देखील ठेवण्यात येतील. यामध्ये विद्यार्थ्यांना लवचिक कर्ज योजना, आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि योग्य निधी मिळवण्याचे मार्गदर्शन दिले जाईल.
फेअरच्या महत्त्वावर भाष्य करताना जैन म्हणाले की, “हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी थेट संपर्क साधण्याची, विविध अभ्यासक्रम जाणून घेण्याची आणि परदेशी शिक्षणाच्या प्रवासासाठी योग्य मार्गदर्शन मिळवण्याची उत्कृष्ट संधी आहे.”
ग्लोबल एज्युकेशन फेअरसाठी नोंदणी मोफत आहे. इच्छुक विद्यार्थी व पालकांनी https://studysmart.co.in/gef या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा अधिक माहितीसाठी ९६५०६ ८००७२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Please follow and like us:
