33
नांदेड –
राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने मौजे बरबडा ता.नायगाव जि.नांदेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे उपक्रमशिल केंद्रीय मुख्याध्यापक तथा माजी प्रभारी केंद्र प्रमुख माधव विठ्ठलराव रेडेवाड बरबडेकर यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव असे उल्लेखनिय कार्याबद्दल व विविध क्षेत्रातील कार्यात तन-मन-धनाने दिलेल्या योगदानाबद्दल महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने माधव रेडेवाड बरबडेकर यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकताच (15 पुरस्कारर्थींना जाहिर झालेले) हे पुरस्कार दि.5 सप्टेंबर 2025 शुक्रवार रोजी दुपारी ठिक 1 वाजता व्हीआयपी रोडवरील कुसूम सभागृह नांदेड येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवर्तन चळवळीचे भाष्यकार, विचारवंत तथा माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मराठा-कुणबी संघटनेचे प्रांत अध्यक्ष गिरीषभाऊ जाधव, शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, उपशिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर, महात्मा फुले शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटराव जाधव, प्रा.डॉ.नागेश कल्याणकर यांची उपस्थिती होती. यावेळी वरील सर्व मान्यवरांचा व्यंकटराव जाधव यांनी शाल व पुष्पहाराने स्वागत केले. यावेळी पुरस्कार प्राप्त सत्कारमुर्ती माधव विठ्ठलराव रेडेवाड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मैनाबाई माधव रेडेवाड बरबडेकर यांचा वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा, मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पहार देवून मान्यवरांच्या हस्ते ह्दय सत्कार करून सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी वरील सर्व अतिथींचे समायोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकटराव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब कानोले यांनी मांडले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी शिक्षणाधिकारी किशन सोने पाटील, माजी पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड, माजी सरपंच केशव कुकूलवाड संगूचीवाडी, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, विठ्ठलराव रेडेवाड बरबडेकर, आरटीओ वसंत कलंबरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.हणमंत मेकेवाड, डॉ.बालाजी आदमपूरकर, मुख्याध्यापक विश्वनाथ चंदलवाड, दादाराव कोठेेवाड, बाळासाहेब उरगुलवाड, मारोती बिच्चेवाड मुदखेड, तुकाराम बोईनवाड, प्रा.ज्ञानेश्वर मरकंटे, रमेश पिट्टलवाड पालमकर, मोहित रेडेवाड, दिनानाथ बोईनवाड, अनपलवाड, महिपती डोंबुलवाड, माधव तांदळे, गंदपवाड, संग्राम हराळे, संतोष डुबूकवाड, दिलीप जेठेवाड, पंडीत ढगे, शिवाजी शेवाळे, सदानंद मरकंठे, माधव जाधव, संदीप चिमलवाड, रविशंकर मरकंठे, विश्वांभर मद्ेवाड, कृष्णकुमार फटाले, प्रविण मांदळे, गजानन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती हो
Please follow and like us:
