Home पिंपरी चिंचवड पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे जाहीर निषेध; मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे जाहीर निषेध; मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करताना, भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी मोरवाडी येथील भाजपा कार्यालय परिसरात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.

या सभेत भाजप शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, “पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या बसवर केलेल्या हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत पुण्यातील काही नागरिकही हौतात्म्य पत्करले. दहशतवाद्यांनी निवडकपणे हिंदू नागरिकांची हत्या केली, ही गोष्ट अत्यंत निंदनीय असून, देशभरात संतापाची लाट उसळली आहे.” केंद्र सरकारकडून या हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या श्रद्धांजली सभेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, सरचिटणीस नामदेव ढाके, तसेच विविध मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये अजय पाताडे, शीतल शिंदे, अनुप मोरे, महेश कुलकर्णी, मनोज तोरडमल, तेजस्वीनी कदम, अजित कुलथे, सुजाता पालांडे, वैशाली खाडे, राज तापकीर, राजू दुर्गे, मोहन राऊत, गणेश ढोरे, सोमनाथ तापकीर, हर्षल नढे, सनी बारणे, मंगेश धाडगे, अमोल डोळस, केशव घोळवे, सुरेश भोईर, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, विठ्ठल भोईर, कैलास सानप, बिभीषण चौधरी, अमेय देशपांडे, रवींद्र देशपांडे, भूषण जोशी, नंदू कदम, देवदत्त लांडे, दीपक नागरगोजे, संतोष भालेराव, समीर जावळकर, राजेंद्र ढवळे, अंतरा देशपांडे, युवराज ढोरे, शिवम डांगे, आदित्य रेवतकर, जयश्री मकवाना, वंदना आल्हाट, प्रतिभा जवळकर, आरती सोनावणे, दिपाली कलापुरे, संतोष जाधव, हिरामण आल्हाट, गोरख पाटील, अभिजित बोरसे, सागर घोरपडे, नंदू भोगले, खंडू कथोरे, दत्ता ढगे, गीता महेंद्रू, राजश्री जायभाय, किरण पाटील, सागर देसाई, शुभम विचारे यांचा समावेश होता.

या श्रद्धांजली सभेमध्ये उपस्थित सर्व नागरिक आणि कार्यकर्त्यांनी काश्मीरमधील बळी पडलेल्या नागरिकांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. सभेच्या शेवटी सर्वांनी एकजूट करून दहशतवादाविरोधात आवाज बुलंद केला आणि देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00