Home पुणे तुळसणी ग्रामसचिवालयाच्या नवीन इमारतीचे आ. शेखर निकम यांच्या हस्ते भुमिपुजन

तुळसणी ग्रामसचिवालयाच्या नवीन इमारतीचे आ. शेखर निकम यांच्या हस्ते भुमिपुजन

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
चिपळुण
मौजे तुळसणी ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामसचिवालय इमारतीचे भुमिपुजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न झाले. महाराष्ट्र शासनाच्या नमो –११ सुत्री कार्यक्रम अंतर्गत या नुतन उभारण्यात येणार्या ग्रामसचिवालय इमारतीस ८० लाख रुपयांचा निधी उपलबद्ध झाला आहे. या इमारतीमुळे सर्वच गावस्तरीय शासकीय व अन्य कामे एकाच इमारतीमधून होणार असल्याने आमदार शेखर निकम यांनी समाधान व्यक्त करीत येथील सरपंच व ग्रामस्थांचे कौतुक केले. सोबतच ग्रामपंचायतीस सुशोभिकरणासाठी आवश्यक वाढीव निधी उपलबद्ध करून देण्यासाठी निधी उपलबद्ध करून दिला जाईल हा विश्वास या कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थांना दिला.
यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, प्रभारी सरपंच सुमिल बेर्डे, उपअभियंता  जि. प. बांधकाम विभाग देवरुख चे  हणमंत शिवपुरे, शाखा अभियंता शिरिषकुमार गायकवाड, विस्तार अधिकारी श्री. घुले, प्रफुल्ल बाईत, शेखर उकार्डे, गजानन सुर्वे, निलोफर मुकादम, बाळकृष्ण चव्हाण, स्मिता सुर्वे, तृप्ती गुरव, प्रकाश सुर्वे, श्रीपत मोहिते, सिताराम आग्रे, वैदही बने, परशुराम घडशी व ग्रामस्थ आदि उपस्थित होते
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00