78
चिखली
पुणे शहरात गाड्या फोडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून अशा गुन्हेगारांचा तसेच कोयता गँगचा ताबडतोब बंदोबस्त करा काय करायचे ते करा तुम्हाला जाहीर मोकळीक देतो. या गुन्हेगारांना अटक करून त्यांची धिंड काढा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पोलिसांना दिले आहेत. 

पिपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे भूमिपूजन व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण समारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी गेल्य काही वर्षात पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. ते पुढे म्हणाले की, जे विकास कामे व इमारती उभ्या राहत आहेत ते काम करत असताना पुढील 50 वर्षाचा विचार डोळ्यासमोर ठेवून सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय उभे करत असताना त्या दृष्टीने विचार केला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत 400 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असून त्याही संदर्भात हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.
२०५४ मध्ये पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ही पुणे शहरापेक्षा जास्त असणार आहे. त्यावेळी पाण्यासह इतर कोणत्याही सुविधा कमी पडणार नाहीत यासाठी नियोजन करण्यात येत आहे.


ताथवडे येथे असलेल्या वळू पैदास केंद्राच्या जागे पैकी 100 एकर जमीन यशदा ला देण्याचे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या काही विकास कामांना देण्याचे ठरले होते त्याचबरोबर येथे पोलीस आयुक्तालयाला देखील जागा देण्याचे निश्चित करण्यात आले होते परंतु जागा हस्तांतरणाच्या वेळी ही सर्व जमीन गृह विभागाला देण्यात आली आहे. गृह विभागाला एवढ्या जागेची आवश्यकता नसून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला बायोडायव्हर्सिटी पार्क, जलशुद्धीकरण केंद्र, पाणीपुरवठा केंद्र, फायर स्टेशन, प्राथमिक व माध्यमिक शाळा व व्यापारी संकुलासाठी जागेची आवश्यकता आहे त्यामुळे या सदर्भात निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली

पुरंदर येथे भरण्यात येत असलेल्या विमानतळा संदर्भात थोडी नाराजी घ्यावी लागणार आहे परंतु हे विमानतळ उभे करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करत ज्यांची जागा भूसंपादित केली जाणार आहे त्यांना चांगला मोबदला देण्यात येईल असे आश्वासन देत अजित पवार म्हणाले की राज्य सरकार शेतकरी व कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडत नाही हे विमानतळ उभे राहण्यात जेवढा विलंब लागेल तेवढा पुण्याच्या विकासाला मर्यादा येणार आहेत. 

पी एम पी एल ला 500 बस खरेदी करण्यासाठी पीएमआरडीए कडून आर्थिक सहकाऱ्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यात कोणताही नवा जिल्हा निर्माण केला जाणार नाही असे सांगत खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दहा वाजता एक भोंगा वाजतो व तो या खोट्या बातम्या पसरवतो असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता टोला लागावत अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर वास्तव्यास गेले नाही त्यामागे त्यांच्या मुलीचे कारण आहे. त्यांची एकुलती एक मुलगी यंदा दहावीला असून तिने परीक्षा होईपर्यंत वर्षावर राहिला जायचे नाही असे मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याने ते अद्याप तेथे वास्तव्याला गेलेले नाहीत मात्र कोणीतरी तेथे शिंगेपूरले आहेत वर्षा पाडून नव्याने बांधकाम केले आहे अशा बातम्या पसरवत आहेत. यासंदर्भात प्रसार माध्यमांना जबाबदार धरत अजित पवार म्हणाले की टीआरपी वाढविण्यासाठी अशी वृत्ते प्रसारित केली जात आहेत. राज्यातील लोकांनी याकडे लक्ष देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी नुकताच दावोस दौरा करून 16 लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले ते म्हणाले की या कार्यक्रमास पुण्याचे पोलीस आयुक्त असावयास हवे होते परंतु ते इथे नाहीत पण कोणत्याही आरोपीची गये करू नका कोणी मोठ्या बापाचा नाही की कोणी छोट्या बापाचा नाही या आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढा . नियम संविधान व घटना याच्या बाहेर जाऊ नका असेही उपस्थित नागरिकांना अजित पवार यांनी सांगितले.
Please follow and like us:
