Home महाराष्ट्र समाज विरोधी पक्ष उमेदवारांना धपाधपा पाडा

समाज विरोधी पक्ष उमेदवारांना धपाधपा पाडा

संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे पाथर्डीत आवाहन

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

(अविनाश देशमुख शेवगांव)

शेवगाव : याबाबत सविस्तर वृत्त असे की आज पाथर्डी शहरात जरांगे पाटील एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान बोलताना जरांगे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले माझ्या समाज्यासाठी मी राजकारणातून माघार घेतली. आरक्षणाचा लढा आरक्षण मिळेपर्यंत चालू ठेवणार आहे. आरक्षणा साठी आपल्याला किती मोर्चे, उपोषणे करावी लागली हे तुम्हा आम्हाला माहीत आहे. आपले आंदोलन कोणी मोडीत काढण्याचा
प्रयत्न केला. तो ही विषय सर्वांना माहीत आहे. आपल्याला आरक्षण मिळवायचे असेल तर भाजप व जातीवादी उमेदवारांना धपाधपा पाडा व आपल्या मतदारसंघात उपोषणकर्त्यांना साथ देणा-या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. असे जाहीर आवाहन मराठा संघर्ष यौद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पाथर्डी येथे एका
मनोज जरांगे पाटलांचा पाथर्डीत अप्रत्यक्षपणे इशारा
भाजपला पाडा आणि जाती वाद्यांना गाडा असा अप्रत्यक्ष आदेश मनोज जरांगे पाटील यांनी पाथर्डी येथे दिला आहे. पाथर्डी शहरात जरांगे पाटील एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान बोलताना जरांगे पाटील यांनी संबंधित भाष्य केले *परंतु स्पष्ट उल्लेख केला नसल्याने आजपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे.* याअगोदर ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला आणा हा सर्वस्वी समाजाचा निर्णय आहे. मात्र, त्यासंदर्भात मी लवकरच निर्णय देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते.
आरक्षण हा समाजाच्या हिताचा लढा आहे. आपण शंभर टक्के आरक्षण घेऊ. त्यानंतरच राजकारणाचा विचार करू, एका जातीवर राजकारण करता येत नसल्याने उमेदवार उभे न करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. *अन्याय झाल्यानंतर साहजिकच विरोध होणार. मात्र, मी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मला विनाकारण समाज अडचणीत आणायचा नव्हता. आपण कोणाचाच प्रचार करणार नाही. कोणाचेही सरकार आले तर त्याला मराठे चॅलेंज करू शकतात.* आम्ही ओ.बी.सी. प्रवर्गातून आरक्षण घेणार असल्याचे सांगत मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणा-याला पाडणार असल्याचीही मनोज जरांगे पाटील यांनी आजपर्यंत ची भुमिका ठेवली आहे तर निवडणूकी नंतर आरक्षण लढा सुरू ठेवणार असुन आता सामुहिक उपोषण करणार असल्याचे ही जरांगे पाटील यांनी सांगितले. यावेळी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पी.आय. संतोष मुटकुळे यांच्या देखरेखीखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

खाजगी कार्यक्रमाला आल्यानंतर समाज बांधवाशी बोलताना आवाहन केले. मनोज जरांगे आपली भुमिका मांडताना म्हणाले की, आपला महाराष्ट्रातील कोणत्याच उमेदवारांना पाठिंबा नाही. मात्र आपल्याला ज्या पक्षाने, ज्या जातीच्या नेत्यांनी आपल्या आरक्षणा विरोधात षडयंत्र रचले अशा पक्षाच्या व त्या जातीच्या
उमेदवारांना पाडल्याशिवाय शांत बसायच नाही.* मी कोणाला पाडा असे नाव घेवून जरी सांगत नसलो तरी सकल मराठा समाजाला चांगले माहीत आहे. आपल्याला आरक्षण विरोधक असलेले आणि जातीवादी उमेदवारांना पराभूत करायचे आहे असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00