त्रिवेणी नगर
पिंपरी चिंचवड शहराला अण्णासाहेब मगरांसारखे सक्षम नेतृत्व मिळाले. त्यामुळे या शहराचे जडणघडण झाली अण्णासाहेब मगरांच्या नंतर महेशदादा लांडगे हे शहराला लाभलेले सक्षम नेतृत्व आहेत. अशी प्रतिक्रिया त्रिवेणी नगर येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव कवितके यांनी पवना समाचार प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली
भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांनी मतदार संघात जी विकास कामे केली आहेत तशी कामे करणारा आमदार राज्यात दुसरा कोणीही नाही असे मत महादेव कवितके यांनी व्यक्त केले आहे.
कवितके म्हणाले की, आमदार महेश दादा लांडगे यांनी विकासाच्या सर्व क्षेत्रात अग्रणी भूमिका पार पडली आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
महादेव कवितके हे भारतीय जनता पार्टीचे एक जुने व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात ते स्वतः व्यावसायिक असून 2012 मध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक या प्रभागातून लढली होती. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी या आदर्शवादी नेत्यामुळे प्रेरित होऊन आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली असे सांगून ते म्हणाले की प्रभाग अध्यक्ष, शहर सरचिटणीस, मंडलाध्यक्ष व आत्ता ओबीसी सेलचा शहर उपाध्यक्ष म्हणून आपण काम करत आहेत
.
प्रभाग क्रमांक 11 कृष्णा नगर, पूर्णा नगर, त्रिवेणी नगर, शिवतेज नगर, कस्तुरी मार्केट, फुलेनगर, शरद नगर आदी कष्टकरी, श्रमिक व कामगार वर्गाचा आणि दाट वस्तीचा भाग असून या भागात 50,000 मतदार आहेत. येथे होणाऱ्या मतदानापैकी जवळपास 70 टक्के मतदान हे महेशदादा लांडगे यांना जाणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे
.
आमदार महेशदादा लांडगे यांनी केलेल्या कामाच्या बद्दलची माहिती देताना कवितके म्हणाले की, आंद्रा भामा आसखेड येथून 468 एम एल डी पाणी त्यांनी शहरासाठी मिळविण्यात यश मिळवले. पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालय आणण्यात महेशदादा लांडगे यांचा मोठा वाटा आहे. रुपीनगर, तळवडे येथील घरे बफर झोन मधून वगळण्यासाठी त्यांनी खूप मोठे यश प्राप्त केले आहे
.
भोसरी व आजूबाजूच्या ग्रामीण भागाच्या दृष्टीने बैलगाडा शर्यत हा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. या शर्यतीसाठी परवानगी प्राप्त करण्यात महेशदादा लांडगे यांच्यामुळे यश मिळाले. कोविडच्या काळात स्वतः महेशदादा लांडगे त्यांचे कार्यकर्ते लोकांच्या सेवेसाठी जीवापाड प्रयत्न करत होते. चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्प, विकासाचे भोसरी व्हिजन, देहू आळंदी पालखी मार्ग , आदी सारखे त्यांचे प्रकल्प खूपच लोकाभिमुख ठरले आहेत.
या परिसरात महावितरणचे विज पुरवठा करणारे स्ट्रक्चर अत्यंत जुने झाले आहे ते नवे व आधुनिक करण्यासाठी म्हणून व येथील उद्योगांना तसेच रहिवासी भागाला विना खंडित वीज पुरवठा व्हावा यासाठीचे महेशदादांचे योगदान खूप मोठे आहे.
प्राधिकरणातून फ्लॅट व प्लॉट घेतलेल्या नागरिकांना त्या जागा फ्रीहोल्ड करण्यासाठी महेशदादांनी प्रयत्न करून येथील लोकांना न्याय मिळवून दिला आहे. घरकुल सारख्या योजनेत जास्तीत जास्त लोकांना घरे मिळावी. भोसरी हिरवीगार असावी यासाठीचेही त्यांचे प्रयत्न खूप मोठे आहेत.
भोसरी परिसरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारून नागरिकांना वैद्यकीय सुविधा अत्याधुनिक मिळाव्यात यासाठीचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या संपूर्ण परिसरात सुलभ पाणीपुरवठा व्हावा यासाठी 15 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात न्यायालय व त्यासाठी जागा व इमारत यासाठीचेही महेशदादांचे प्रयत्न शहराच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरले आहेत. मेट्रो, शास्तीकर माफी, संविधान भवन, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, संतपीठ, वेस्ट टू एनर्जी यासारख्या योजना राज्यात गाजल्या आहेत.
मोशी येथे उभे राहत असलेले विपश्यना केंद्र हा एक आदर्शवत प्रकल्प महेशदादांनी शहरासाठी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजाच्या सर्व घटकांना, जाती धर्माला एकत्रित घेऊन सर्वांच्या हिताचे प्रकल्प महेशदादांनी राबवले हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
महेशदादा यांच्या बद्दल वर्णन करताना कवितके म्हणाले की महेशदादा म्हणजे आंधळ्या माणसासाठी चा डोळा आहे. अपंगासाठी ची काठी आहे व बाळासाठीची आई आहे.
लोकसभा निवडणुकीत या परिसराने मित्र पक्षाचे उमेदवार असताना मताधिक्य मिळवून दिलेले होते. परंतु आता विधानसभा निवडणुकीत स्वतः महेशदादा लांडगे असून कमळ चिन्हावर ते निवडणूक लढवत असल्याने येथील मतदार अतिशय आनंदी झाला आहे .मतदारांनी स्वतः ही निवडणूक हातात घेतली आहे व या परिसरातील कष्टकरी, कामगार प्रचंड मताधिक्याने महेशदादा लांडगे यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी करतील असा विश्वास कवितके यांनी व्यक्त केला आहे.
