Home पिंपरी चिंचवड पीसीपीच्या आर्य माडीवाले याचा “ग्रॅव्हिटी २के२६ पिच परफेक्ट” स्पर्धेत द्वितीय क्रमांक 

पीसीपीच्या आर्य माडीवाले याचा “ग्रॅव्हिटी २के२६ पिच परफेक्ट” स्पर्धेत द्वितीय क्रमांक 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी
एखाद्या दुकानात, शॉपिंग मॉलमध्ये खाद्य वस्तू खरेदी करताना त्याच्या दर्जा विषयी आपण संभ्रमात असतो, हा संभ्रम दूर करण्यासाठी पीसीपीच्या आर्य माडीवाले या विद्यार्थ्याने विकसित केलेले “फूड डी कोड ए आय” हे मोबाईल एप्लीकेशन सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरेल. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक आणि संशोधक वृत्ती विकसित व्हावी व त्यांच्या संशोधनाचा सामान्य नागरिकांना उपयोग व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सर्व संस्थांमध्ये उच्च दर्जाची शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळते. आर्य माडीवाले याने “ग्रॅव्हिटी २के२६ पिच परफेक्ट” या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला, याचा आम्हाला अभिमान वाटतो असे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.
पुण्यातील के. जे. एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनीरिंग, पिसोळी या महाविद्यालयात “ग्रॅव्हिटी २के२६ – पिच परफेक्ट” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकचा (पीसीपी) विद्यार्थी आर्य माडीवाले याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याला प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रु.३००००/- रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पीसीईटी कार्यालयात आर्य माडीवाले याचा पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पीसीईटी च्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीपी प्राचार्या डॉ. विद्या बॅकॉड, संगणक विभाग प्रमुख मंगला माळकर आदी उपस्थित होते.
 या स्पर्धेत विविध इंजिनीरिंग कॉलेज मधून १८० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होते. या स्पर्धेमध्ये हेल्थकेयर आणि बायोटेक, फिनटेक आणि ई कॉमर्स, ॲग्रीटेक आणि रुरल एम्पावरमेंट, सस्टेनेबल सोल्युशन्स आणि स्मार्ट सिटिज, स्किल्स आणि एज्युटेक अशा विषयांवर प्रकल्प सादर करायचे होते. यामध्ये पीसीपी मधील प्रथम वर्ष विद्यार्थी आर्य माडीवाले याच्या हेल्थकेअर आणि बायोटेक या विभागात ‘फूड डिकोड ए आय’ हे मोबाईल एप्लीकेशन ला द्वितीय क्रमांक मिळाला.
  या ॲप्लिकेशन विषयी अधिक माहिती देताना आर्य माडीवाले यांनी सांगितले की, आपण एखाद्या दुकानात अथवा शॉपिंग मॉलमध्ये पॅकिंग केलेली खाद्य वस्तू खरेदी करताना त्यावरील बारकोड ‘फूड डिकोड ए आय’ या एप्लीकेशन मध्ये स्कॅन केला की, त्या वस्तू मधील न्यूट्री स्कोर फॅट व इतर माहिती ताबडतोब मिळते तसेच त्या खाद्य वस्तू ऐवजी अधिक चांगली पर्यायी दुसरी कोणती उपलब्ध आहे हे देखील समजते यामुळे आपण योग्य दर्जाची वस्तू खरेदी करू शकतो. खरेदी केलेल्या सर्व वस्तूंचे एकत्रित ‘हेल्थ रेटिंग’ यातील स्मार्ट कार्ट फीचर द्वारे ताबडतोब समजते. तसेच हे एप्लिकेशन्स आपल्याला आरोग्य विषयक देखील मार्गदर्शन करते, जसे की मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने कोणते पदार्थ खायला हवेत कोणते नको. तसेच चॅट बॉट द्वारे देखील हे ॲप माहिती देते व मागदर्शन करते. हे एप्लीकेशन करण्यासाठी प्राचार्य विद्या बॅकॉड आणि आमच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00