Home ताज्या घडामोडी राज्यस्तरीय टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धेत पीसीपी मुलींचा संघ उपविजेता

राज्यस्तरीय टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धेत पीसीपी मुलींचा संघ उपविजेता

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण आंतर पदविका विद्यार्थी स्पोर्ट्स असोसिएशन यांनी स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पंढरपूर येथे आयोजित केलेल्या डी – १ झोनल टेबल टेनिस स्पर्धेत मुंबई येथील विद्यालंकार पॉलिटेक्निक मुलींच्या संघाने पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) मधील मुलींच्या संघावर अंतिम लढतीत विजय मिळविला.
 पीसीपीच्या टेबल टेनिस मुलींच्या संघात भार्गवी मराठे, मानसी ताम्हाणे, यशश्री टेंबरे, ऋतुजा माळकर, भक्ती भुमे यांचा समावेश होता.
 बॅडमिंटन स्पर्धेत मुंबई येथील के जे सोमय्या तंत्रनिकेतन विद्यालयाच्या मुलींच्या संघाने पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक संघावर विजय मिळवला. उपविजेत्या पीसीपीच्या बॅडमिंटन मुलींच्या संघात अनुष्का बहिरट, जानवी पाटील, समीक्षा गरगटे, रिद्धीश्री वनगुट्टे आणि सई पाटील यांचा समावेश होता. क्रिडा प्रभारी सुनील जगताप, किशोर गव्हाणे, लक्ष्मी थरकुडे, प्रा. जे. यू. शिंदे, वर्षा राजमाने, एन. व्ही. सूर्यवंशी पी. एस. उंडे यांनी मार्गदर्शन केले.
 पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीपी प्राचार्या डॉ. विद्या बॅकॉड यांनी टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धेत राज्यस्तरीय उपविजेतेपद पटकावल्याबद्दल मुलींच्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00