58
पिंपरी चिंचवड
झपाट्याने वाढत असलेले औद्योगिकीकरण आणि त्यामुळे वाढलेले नागरिकीकरण यामुळे पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलख हा भाग विकासाच्या बाबतीत महत्वाचा मानला जात आहे. आय टी कंपन्या पिंपळे निलखच्या जवळ असल्याने या भागामध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढलेल्या औद्योगिकीकरणाने पिंपळे निलख भागात ठेकेदारी आणि या भागावर आपले वलयं निर्माण करणे यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षितता धोक्यात आली आहे.
तसेच वाढती लोकसंख्या आणि शहराचे वाढते औद्योगिकीकरण यामुळे या भागात कायदा सुव्यवस्था टिकणे देखील तितकेच महत्वाचे असल्याने आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड युवा शहराध्यक्ष रविराज काळे यांनी पिंपळे निलख भागातील विशालनगर येथे पोलिस चौकी उभारण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
त्यामुळे आम आदमी पार्टी आणि युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या मागणीला नागरिकांचा पाठिंबा वाढत असल्याने या भागात पोलिस चौकी होणे महत्वाचे म्हणाले जात आहे.
Please follow and like us:
