22
पिपंरी
नृत्यकला मंदिर आयोजित नृत्यंजली हा नृत्य रुपीपुष्पे हा 70 विद्यार्थ्यांचा भरतनाट्यम नृत्यावर आधारित कार्यक्रम मनोहर वाढोकर सभागृह निगडी येथे मोठ्या उत्साहात सादर झाला.
भरतनाट्यमच्या सुप्रसिद्ध गुरु तेजश्री अडिगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा त्रिदशकपूर्ती सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मॉरिशस महाराष्ट्र मंडळ फेडरेशनचे अध्यक्ष बलराज नारू, सदस्य रवीन राव आणि मॉरिशस-भारत कल्चरलचे रिलेशन कमिशनर संदिप जोशी ,सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी मुकादम, नवनिर्वाचित नगरसेविका शैलजा मोरे,संस्थेचे विश्वस्त अविनाश अडिगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात वयोगट 7 ते 22 वर्षाच्या 70 विद्यार्थिनींनी विविध नृत्य प्रकार सादर केले. श्लोकमनी सुरुवात झाली, सात वर्षाच्या विद्यार्थिनींनी पुष्पांजली सादरीकरण करून टाळ्यांची दाद मिळवली.
पहिली ते तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी विविध अडवू चे सादरीकरण केले,
त्याचबरोबर अलारीपू ,गणेश कीर्तन, सरस्वती कौतुकम, शिव आणि पार्वती यांच्यावरील अभिनय पद,तिल्लाना आणि मंगलम असे पारंपारिक भरतनाट्यमच्या नृत्य रचना सादर केल्या.
यावेळी मुलींनी सादर केलेले सर्वच नृत्याआविष्कार लक्षवेधी ठरले.
एक ते सहा वर्षे पूर्ण केलेल्या निवडक विद्यार्थिनींचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
मॉरिशस महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष बलराज नारू यांनी तेजश्री आडीगे यांच्या कार्याचा विशेष कौतुक करीत मॉरिशसच्या राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नृत्यकला मंदिरच्या विद्यार्थ्यांना निमंत्रण दिलं.
अभिनेत्री अश्विनी मुकादम यांनी पालकांचे विशेष कौतुक करून अभ्यासाबरोबर नृत्य कला जतन करावे, असा सल्ला दिला.
भारत -मॉरिशस आंतरराष्ट्रीय कल्चरल कमिशनर संदीप जोशी यांनी तीस वर्षे सातत्याने नृत्य कला मंदिराचे कार्य देशात- विदेशात गाजत आहे. नृत्यकला मंदिराने भविष्यात होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन केले.
नगरसेविका शैलजा मोरे म्हणाल्या कि,
आपल्या गुरुचा आदर कायम राखला पाहिजेत. कलेची आणि गुरुची साथ कधी सोडू नये.
या कार्यक्रमांमध्ये मृदुंग एच. वेंकटरमण,गायनाची साथ महती गुरुमुर्ती यांनी तर व्हायोलीन वर तर अजय चंद्रमौली यांनी.
यावेळी मॉरीशस मध्ये गणेश महोत्सवात पंतप्रधानांसमोर महाराष्ट्राची कला संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करण्यात आल.
माहेश्वरी जोशी,विणा भोसले,हरिप्रिया चौधरी, वैष्णवी शर्मा यांचा विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन विद्या जोशी यांनी केले.
या कार्यक्रमासाठीच्या संयोजनासाठी सिद्धी कटारिया, श्वेता महाजन, तेजस्विनी इनामदार यांनी सहकार्य केले.
यावेळी उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून खालील विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
प्रथम वर्ष- कस्तुरी देशपांडे, ओवी देशमुख, स्वरा सानांसे, दूर्वा लांडगे चैतन्य भोपाळे आराध्या चरडे
वर्ष दुसरे- स्वरांजली केसवड अद्विका येवले आराध्या काळे
वर्ष तिसरे-गायत्री शेडगे, काव्यां पांढरकर, समृद्धी गायकवाड
चौथे वर्ष- अवनी पाटील समीक्षा कटिंग आरोही डोंगरदिवे
*वर्ष पाचवे-आराध्य इनामदार, आर्या पाटील, कनिष्का आचार्य
*वर्ष सहावे- आर्या कुलकर्णी
Please follow and like us:
