पुणे

  राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध धायरी व दौंड येथे कारवाई करून एकूण 40 लाख 5 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग, पुणे यांच्या पथकाने धायरी फाटा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत संशयित टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (एमएच 12 व्हीएल 0955) वाहनाची तपासणी केली असता गोवा राज्यातील खालीलप्रमाणे मोठ्या प्रमाणात मद्य आढळून आले. यात मॅकडॉवेल नं. 1 व्हिस्की   180 मिली   288 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की   180 मिली 192 बाटल्या, इंपिरियल ब्ल्यू व्हिस्की 180 मिली 240 बाटल्या असा एकूण रु. 24 लाख 4 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घटनास्थळी अमर पुंडलिक बोडरे (रा. सातारा) व चेतन मधुकर बाटे (रा. नऱ्हे, पुणे) यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान चेतन बाटे यांच्या घरी छापा टाकून मॅकडॉवेल नं. 1, रॉयल स्टॅग व इंपिरियल ब्ल्यू च्या प्रत्येकी 144 बाटल्या जप्त करण्यात आल्या.  तसेच गोवा  एड्रिएल क्लासिक व्हिस्की (७५० मिली) ३६ बाटल्या, विविध बनावट बुचे ६०० नग, रिकाम्या बाटल्या १९२ नग व मोबाईल असा एकूण 1 लाख 18 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या फ्लॅटमध्ये राहणारे आरोपी तुषार सुभाष काळाणे (रा. पुरंदर) यांच्या घरातून गोवा राज्‍य निर्मित एड्रिएल क्लासिक व्हिस्की २८४ बाटल्या, बनावट बुचे – ७५० नग व मोबाईल असा एकूण 4 लाख रु. 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत  एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण रु. 29 लाख 92 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दौंड विभागा मार्फत 10 लाख  12 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त

दौंड येथील स्वामी चिंचोली येथून  इंपिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या  480 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 240 बाटल्या व मोबाईल असा एकूण रुपये 8 लाख 85 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घटनास्थळी वैभव साळुंखे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या घरातून  विविध ब्रँड्सच्या एकूण 432 बाटल्या, बनावट लेबल्स १३‍०० नग असा एकूण 1 लाख 27 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत  एकूण 3 आरोपी अटकेत असून एकूण  10 लाख 12 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला.

या प्रकरणांचा पुढील तपास अनुक्रमे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, डी विभाग, राज्य उत्पादन शुल्क, पुणे व दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे हे करीत आहेत.

अवैध मद्यविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितले. तसेच  अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध नियमितपणे कारवाई सुरू राहील. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर तात्काळ टोल फ्री क्र. 1800 233 9999 व दूरध्वनी क्र. 020 – 26058633 येथे संपर्क साधावा.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00