Home पिंपरी चिंचवड गॅस सिलेंडरच्या काळयाबाजाराच्या मुद्द्यावर आमदार जगताप यांनी विधानसभेत सरकारला विचारला जाब

गॅस सिलेंडरच्या काळयाबाजाराच्या मुद्द्यावर आमदार जगताप यांनी विधानसभेत सरकारला विचारला जाब

चिखलीतील अवैध गॅस भरणी प्रकरणी गुन्हे दाखल –  अजित पवार यांची माहिती

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
मुंबई
पिंपरी-चिंचवड शहरात गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा मुद्दा विधानसभेत गाजला. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात या गंभीर मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याची माहिती दिली.

चिखलीत अवैध गॅस भरणीचा प्रकार

आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली गावात भरलेल्या सिलेंडरमधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे अवैध प्रकरण उघडकीस आल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार यांनी सदर घटना चिखली गावठाण येथे घडल्याचे स्पष्ट केले. तसेच, अशा प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता असल्याचे मान्य केले.

गॅस चोरी आणि अनधिकृत वापराच्या घटनांवर कारवाई

जगताप यांनी पुढे विचारले की, रोजगारासाठी परराज्यातून आलेले कामगार कागदपत्रांच्या अभावामुळे लहान खाजगी सिलेंडर वापरत आहेत आणि हॉटेल व्यावसायिक अनधिकृतपणे घरगुती गॅसचा वापर करत आहेत. यावर बोलताना अजित पवार यांनी ही बाब अंशतः खरी असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, एलपीजी ऑर्डर २००० (पुरवठा आणि वितरण) मधील पॅरलल मार्केटिंग सिस्टीम अंतर्गत गॅस एजन्सीद्वारे लहान सिलेंडर उपलब्ध करून दिले जातात. मात्र, अनधिकृत वापर रोखण्यासाठी वेळोवेळी तपासणी मोहिमेच्या माध्यमातून कारवाई केली जाते.

गेल्या काही काळात या अशा स्वरूपाच्या तीन घटना घडल्या असून, या प्रकरणांमध्ये दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणात वापरलेले सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहितीही पवार यांनी दिली.

सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाद्वारे गॅस एजन्सी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, शासनस्तरावरून वेळोवेळी कार्यवाहीसाठी सूचना देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या अवैध प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी म्हटले आहे.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00