56
बारामती
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी तानाजी प्रभाकर कर्चे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे; या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करीत आहेत.
इंदापूर येथील नारायणदास महाविद्यालयासमोरील गेटवर काही मुले गाड्याच्या पुंगळ्या काढून वाहनाची स्पर्धा लावून गोंधळ घालत आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी ‘डायल ११२ टोल फ्री’ क्रमांकावर केली. या परिसरात बस स्थानक, आय कॉलेज असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने स्थळाची तात्काळ पाहणी केली.
या ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणताना सरकारी कामात अडथळा आणत तानाजी प्रभाकर कर्चे, वय २६ वर्षे, रा. कौठळी यांनी पोलिसांसोबत वाद घातला. पोलीस शिपाई महेश साधू रणदिवे यांच्यासोबत अरेरावी भाषेचे वापर करत जातीवाचक शिवीगाळ केली तसेच त्यांना धक्काबुक्कीही केली. याबाबत श्री. कर्चे हे वारंवार आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होते.
पोलीस शिपाई श्री. रणदिवे घडलेल्या घटनेबाबत यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. श्री. कर्चे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, नागरी हक्क संरक्षण अधिनियम आदीतील विविध कलमान्वये इंदापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून २८ जानेवारी रोजी अटक करण्यात असून ३१ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राठोड यांनी दिली आहे
Please follow and like us:
