Home पुणे देशाची स्व-प्रतिष्ठा  ‘स्वातंत्र्य प्राप्तीमध्येच’ प्रस्थापित झाली.. हे का मान्य नाही..?

देशाची स्व-प्रतिष्ठा  ‘स्वातंत्र्य प्राप्तीमध्येच’ प्रस्थापित झाली.. हे का मान्य नाही..?

 काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
  पुणे
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कोणताही त्याग, संघर्ष, योगदानाची भुमिका न घेताही, प्रजासत्ताक भारतात केवळ खोट्या व तथ्यहीन आरोपांच्या व वारेमाप आश्वासनांच्या आधारे सत्ता प्राप्ती झालेल्यांना देशाच्या ‘स्वातंत्र्य संग्रामाचे’ मोल कळणे अवघड असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वातंत्र्या प्रती नुकत्याच केलेल्या विधानावर केली.
ते पुढे म्हणाले की, मोहन भागवत यांनी किमान याचे स्मरण ठेवावयास पाहिजे होते की, इंग्रजांच्या गुलामगिरी काळात ‘राजेशाही व निजामशाहीत’ विभागलेल्या खंड – प्राय भारतात.. तब्बल ४५० वर्षे न सुटलेला ‘राम मंदिराचा’ प्रश्न.. केवळ प्रजासत्ताक भारतातील ‘संविधानीक – न्यायव्यवस्थे’ मुळेच् ७० वर्षात शांततेने मार्गी लागला.
स्वातंत्र्य प्राप्ती व देशाची स्वप्रतिष्ठा वेगळी कशी..?
देशाची स्व-प्रतिष्ठा १५ ॲा १९४७ च्या ‘स्वातंत्र्य प्राप्तीमध्येच’ प्रस्थापित झाली.. हे संघास का मान्य नाही..? स्वातंत्र्य संग्रामात योगदान नसल्याच्या न्यूनगंडामुळे संघ, जनसंघ वा भाजप समर्थकांकडून हे होत आहे काय..? असे सवाल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते यांनी केले.
खरेतर, भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीत काँग्रेस’च्या योगदानावर भागवतांनी या पुर्वीच प्रशंसनीय विधाने ही केली आहेत, मात्र स्वातंत्र्य संग्रामा बाबत पुन्हा – पुन्हा तिरस्कार दर्शवणारी वक्तव्ये मोहनराव भागवत ‘कोणाच्या दबावाखाली करतात’ (?) त्यातुन स्वातंत्र्य संग्राम विषयी संघाच्या कृतघ्नतेचे संस्कारच पुन्हा पुन्हा स्पष्ट होत असल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00