48
पिंपरी
पिंपरी चिंचवड परिसरातील प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर संभाजीनगर एचडीएफसी कॉलनी येथे वारंवार वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत या परिसरातील हा अंधकार दूर करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माजी उपमहापौर केशव घोळवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महावितरणच्या भोसरी डिव्हिजन अंतर्गत प्रभाग क्रमांक दहा मधील शाहूनगर संभाजीनगर एचडीएफसी कॉलनी हा परिसर येत असतो या परिसरासाठी 22 किलोवॅटची वीज वितरण व्यवस्था टाकण्यात आली आहे. परंतु ही सर्व व्यवस्था अत्यंत पुरातन असून जीर्ण झाली आहे त्याचबरोबर ही व्यवस्था उद्योगांसाठी असल्याने ती बदलून त्या ऐवजी घरगुती 11 किलो बॅटची वीज वितरण व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी घोळवे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केशव गुळवे यांनी म्हटले आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर संभाजीनगर एचडीएफसी कॉलनी हा परिसर येत असून तीस वर्षांपूर्वी हा परिसर विकसित झाला आहे येथील परिसरात वीज वितरण व्यवस्थेने घरगुती वीज पुरवठ्यासाठी देखील 22 किलो व्हॅटची वीज वितरण व्यवस्था दिली आहे. या व्यवस्थेला आता दीर्घकाळ झाला असून ही व्यवस्था अत्यंत जीर्ण झालेल्या केबलसमुळे तसेच 22 किलो वॅट लेव्हल ही खूप संवेदनशील असल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा सातत्याने विस्कळीत होत असतो त्यामुळे येथील नागरिकांना बराच वेळा अंधारात बसावे लागते नागरिकांना याचा खूप मनस्ताप व नाहक त्रास होत आहे निवासी भागात ज्या पद्धतीने अकरा किलो वॅट वीज वितरण व्यवस्था आहे त्याप्रमाणेच या परिसरात देखील 11 किलो वॅट ची वीज वितरण व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केशव घोळवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Please follow and like us:
