Home राजकीय डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या सिंधी भाषेतील व्हिडिओ आवाहनाने सिंधी मतदार भावूक

डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या सिंधी भाषेतील व्हिडिओ आवाहनाने सिंधी मतदार भावूक

अखंड सिंधी समाज डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीशी

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

सिंधी समाज हा अतिशय संघर्षातून व स्वाभिमाने जगत आलेला समाज आहे. अतिशय खडतर अशा परिस्थितीतून वाट काढत सिंधी समाज आज प्रगतीच्या वाटेवर आहे. आजही हा समाज अनेक समस्यांनी वेढला गेला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सिंधी बांधवांना ज्या राजकीय इच्छाशक्तीची व पाठबळाची आवश्यकता आहे ते त्यांना भेटले नाही.

सिंधी समाजात अनेक समस्या आहेत. ज्या सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक स्तरावर दिसून येतात. सिंधी भाषा आणि संस्कृतीचे जतन, आर्थिक अस्थिरता, धार्मिक आणि सामाजिक भेदभाव, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी, राजकीय प्रतिनिधित्व, शैक्षणिक सुविधा, या सर्व समस्या संस्कृती जपण्यासाठी शासकीय स्तरावर व महापालिका स्तरावर प्रयत्न आणि राजकीय हक्कांची जाणीव यातून सोडवल्या जाऊ शकतात.

फाळणीच्या वेळी सिंधी समाजाने खूप काही गमावले. काही कुटुंबांसाठी आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे आजही आव्हानात्मक आहे. परंतु राजकीय इच्छाशक्ती अपुरी असल्याकारणाने पिंपरी कॅम्प मधील सिंधी समाज आज चुकीच्या उमेदवाराला निवडून दिल्याने पश्चाताप व्यक्त करीत आहे.

गेल्या दहा वर्षांमध्ये साधी साधी कामे देखील पूर्ण होत नाहीत, विद्यमान आमदारांकडे चकरा मारून चपला झिजल्या आहेत, तारीख पे तारीख आशी अवस्था निर्माण झाली आहे. अशा तक्रारी सिंधी बांधव करीत आहेत. व्यवसाय करताना अनेक अडचणी येत आहेत हफ्तेखोरी, धमक्या, ट्रॅफिक, अरुंद रस्ते, वीज, पार्किंग अशा अनेक समस्यांमुळे सिंधी बांधव मेटाकुटीला आला आहे. यंदा परिवर्तन करणारच असे समाजाने ठरविले असल्याचे चित्र पिंपरी मध्ये दिसत आहे.

डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या रूपाने आशेचा किरण दिसून येत आहे हा विचार करून अखंड सिंधी समाज डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीमागे उभा असलेला दिसून येत आहे.

डॉ. सुलक्षणा यांनी सिंधी भाषेत व्हिडिओ बनवून समाजाबाबत आपुलकीची भावना व्यक्त केली असून सिंधी बांधव इथून पुढे कुठल्याही विकासापासून वंचित राहणार नाही याची हमी देत देत असल्याचे आश्वासन सुलक्षणा शिलवंत यांनी सोशल मीडियावरून दिले आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून सिंधी समाज व्हिडिओ च्या माध्यमातून केलेल्या आवाहनाने भावूक झाला आहे. हिंदी भाषेत सुरक्षेला शीलवंत यांनी केलेल्या आवाहनामुळे हिंदी मतदारांना सुलक्षणा या आपल्या वाटू लागले असून होणाऱ्या मतदानापैकी 80% सिंधी मतदान हे सुलक्षणा शिलवंत यांना होईल असा विश्वास सिंधी समाज बांधवांनी केला आहे.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00