Home राजकीय शहरातील ‘रेडझोन’ चा प्रश्न महेशदादाच सोडवणार!

शहरातील ‘रेडझोन’ चा प्रश्न महेशदादाच सोडवणार!

रूपीनगर त्रिवेणीनगरचे मतदार महेशदादांना विजयी करणार

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

भाजपा कार्यकर्ते किरण पाटील यांनी केला विश्वास व्यक्त

पिंपरी । प्रतिनिधी
रुपीनगर त्रिवेणी नगर तळवडे या परसरातील रेड झोन बाधित घरांचा प्रश्न आमदार महेश दादा लांडगे हेच सोडू शकतात असा विश्वास असल्याने येथील मतदार ठामपणे महेश दादा लांडगे यांच्या पाठीशी उभे आहेत व विधानसभा निवडणुकीत आमदार महेशदादा लांडगे यांनाच विजयी करतील असा विश्वास येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किरण पाटील यांनी व्यक्त केला आहे.

रुपीनगर त्रिवेणी नगर तळवडे या परिसरात रेड झोनचा प्रश्न खूप ज्वलंत प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक नेते आले त्यांनी अनेक आश्वासने दिली मात्र येथील सर्वसामान्य माणसाच्या हातावर तुरी ठेवल्या. हा प्रश्न सोडवण्यासाठी गेली दहा वर्षापासून भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे हे प्रयत्न करत असून तेच हा प्रश्न सोडवू शकतील असा विश्वास या परिसरातील लोकांना आहे. त्यामुळे भोसरी विधानसभेतील महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महेश दादा लांडगे यांनाच येथील मतदारांचा पाठिंबा असून ते आमदार महेश दादा लांडगे यांना भरभरून मते देतील असे मत किरण पाटील यांनी पवना समाचार प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

किरण पाटील हे भारतीय जनता पार्टीचे रुपीनगर परिसरातील अतिशय तळमळीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील निवृत्ती पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतिशय जुने कार्यकर्ते. निवृत्ती पाटील यांनी रुपीनगर तळवडे त्रिवेणी नगर या कष्टकरी व कामगारांची बहुसंख्य वस्ती असलेल्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पूर्वी ते जंगली महाराज सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून स्वर्गीय मामनचंद अगरवाल यांच्यासोबत देखील काम करत होते. हिंदुत्ववादी विचारसरणी व राष्ट्रप्रेम यांनी प्रेरित असलेल्या निवृत्ती पाटील यांचा वारसा लाभलेले किरण पाटील हे त्याच तळमळीने आणि ध्येयाने रूपीनगर त्रिवेणीनगर परिसरात कार्यरत आहेत.

रेडझोन सोडवण्यासाठी महेशदादांच्या प्रयत्नांची पराकाष्टा…
रुपीनगर त्रिवेणी नगर व तळवडे येथील बहुसंख्या भाग रेड झोन बाधित आहे या भागात पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या कष्टकरी श्रमिक कामगार बांधवांनी गुंठा अर्धा गुंठा जागा घेऊन आपले स्वप्नातले घर उभे केले आहे. मात्र रेड झोन बाधित हा भाग असल्याने या कष्टकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या घामातून उभ्या केलेल्या घरांवर कारवाईची टांगती तलवार सातत्याने आहेत. येथील रेडझोनचा प्रश्न सुटावा याकरिता गेली अनेक वर्षे येथील लोकांचा लढा चालू आहे यापूर्वी अनेक नेत्यांनी हा प्रश्न सोडवू म्हणून आश्वासनांची खैरात केली होती. पण निवडणुकी पुरती पोपटपंची करणारे हे नेते नंतर गायब होत असत. पण गेली दहा वर्षे येथील रेड झोन चा प्रश्न सुटावा म्हणून महेश दादांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे यापूर्वीचे संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना भेटून त्यांनी हा प्रश्न मार्गी ही लावला होता परंतु दुर्दैवाने पर्रीकर साहेबांचे देहावसन झाल्याने हा प्रश्न पुन्हा प्रलंबित राहिला आहे. असे असले तरी महेश दादा लांडगे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी चा पाठपुरावा सातत्याने चालू ठेवला आहे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय पक्षश्रेष्ठींकडे ते सातत्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत व आमदार महेश दादा लांडगे 100 टक्के हा प्रश्न सोडू शकतील असा या परिसरातील नागरिकांना विश्वास असल्याचे किरण पाटील यांनी सांगितले.

महेशदादाच्या नेतृत्त्वावर विश्वास…
रेडझोनमुळे दाट लोकवस्ती असलेल्या या भागात महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणावी अशी विकास कामे होऊ शकलेली नाहीत. मात्र, आमदार निधीतून, जिल्हा नियोजन समितीमार्फत नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात. पाणी रस्ते आरोग्य विषयक सुविधा स्वच्छता दवाखाने शाळा आदीसाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून सुविधा उपलब्ध करून दिले आहेत व येथील नागरिकांना दिलासा दिला आहे. रेड झोन चा प्रश्न सुटल्यास येथील विकासाला नक्की गती मिळेल व महेशदादा लांडगे या परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकतील, असा विश्वासही किरण पाटील यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया :
महेशदादा लांडगे यांचा या परिसरात सातत्याने संपर्क आहे येथील सोसायट्यांमध्ये अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत येथील तरुणांची मंडळे विविध मंदिरांची कामे महेश दादांमुळे पार पडले आहेत गेले दहा वर्षे महेश दादा येथील लोकांच्यात सातत्याने मिसळत असल्याने घराघरात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आमदार महेश दादा लांडगे यांच्या बद्दल जिव्हाळा निर्माण झाला आहे लोकांच्या या प्रेमाचे नक्कीच मतांमध्ये रूपांतर होईल व गेल्या दोन निवडणुकात येथील मतदार ज्या ताकदीने महेश दादांच्या मागे उभे राहिले त्यापेक्षा जास्त ताकदीने यावेळी ते महेश दादांच्या मागे उभे राहून भरभरून मतदान देतील.
– किरण पाटील, निष्ठावंत कार्यकर्ते, भाजपा.भाजपा कार्यकर्ते किरण पाटील यांनी केला विश्वास व्यक्त

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00