ताज्या घडामोडी

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ

पुणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करावे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या…

Read more

रविवार दि. २८ जून रोजी शहरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम’ 

पिंपरी जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, त्याअनुषंगाने देशात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन त्यांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.    याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.   या मोहिमेअंतर्गत दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील विविध पोलिओ बूथवर बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांचे लसीकरण करणार आहेत.   ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना व सुमारे ५००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती…    शहरातील ५ वर्षांखालील सर्व बालकांपर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत एकूण ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये १००८ स्थायी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानकांवर ३५ ट्रान्झिट लसीकरण केंद्रे, तर वीटभट्ट्या, बांधकामे आणि स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्यांमध्ये ७७ फिरती लसीकरण केंद्रे कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, रात्रीच्या वेळेतही लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी तीन नाईट टीम कार्यरत असतील.   सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.   मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरभर पत्रके, बॅनर्स, स्टीकर्स, वॉल पेंटिंग, व्हि.एम.डी डिस्प्ले (VMD), सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन तसेच विविध सोशल मीडिया माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. “पोलिओमुक्त भारताचे यश टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. रविवार, दि. २८ जून रोजी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.”  डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका …

Read more

महापालिका प्रशासकीय भवन अन्‌ ‘अजित सृष्टी’चे एकत्रित लोकार्पण!

 भाजपा आमदार महेश लांडगे यांची महापालिका आयुक्तांना सूचना पिंपरी-चिंचवड  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या ‘अजितसृष्टी’ या प्रकल्पाचा समावेश…

Read more

अवैध मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे थेट परमीट रद्द होणार- आमदार शंकर जगताप

पिंपरी खाजगी प्रवासी आणि लक्झरी बसेसच्या टपावर तसेच अंतर्गत भागात बेकायदेशीरपणे केली जाणारी ‘कुरिअर पार्सल’ची वाहतूक रोखण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. केवळ दंड वसूल करून नियम…

Read more

पिंपरी-चिंचवड “आयआयएम” शाखा उभारणीला “बुस्टर”

 भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला मोठे यश पिंपरी- चिंचवड पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. शहरात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (IIM) ची शाखा उभारणीला…

Read more

देहू-आळंदी पंचक्रोशीला मिळणार ‘संतभूमी’चा दर्जा – आमदार शंकर जगताप

 वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा वृद्धिंगत होणार पिंपरी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी या पवित्र भूमीला ‘संतभूमी’ म्हणून घोषित करावे, अशी आग्रही मागणी…

Read more

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

पिंपरी,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) या संस्थेत ऑगस्ट २०२६ प्रवेश सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेतील सर्व प्रवेशित जागांवर शासन नियमावली व आरक्षणानुसार कॅप राऊंड प्रणालीद्वारे प्रवेश देण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली आहे.   कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, डी.टी.पी., कॉस्मेटोलॉजी, फॅशन डिझायनिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, हॉस्पिटल हाऊसकीपिंग हे प्रत्येकी एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किमान शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण एवढी आहे. तर संस्थेच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हा दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम चालविला जात असून यासाठी किमान शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या मिळून एकूण १४० जागा उपलब्ध असून विद्यार्थिनींना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा संस्थेमध्ये निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय येथे रोजगारक्षम तसेच स्वयंरोजगाराच्या अनेक संधीही उपलब्ध आहेत.   या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थिनींनी अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशाची वैशिष्ट्ये  • पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवासी उमेदवारांना वार्षिक प्रशिक्षण शुल्क १ हजार ५०० रुपये व अनामत रक्कम ६०० रुपये आकारण्यात येईल. • पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील रहिवासी उमेदवारांना वार्षिक प्रशिक्षण शुल्क ३ हजार रुपये व अनामत रक्कम ६०० रुपये आकारण्यात येईल. • महापालिका धोरणानुसार प्रवेशित विद्यार्थिनींना प्रत्येक महिन्याला ५०० रुपये इतके विद्यावेतन देण्यात येईल. • विविध आस्थापनांमध्ये ऑन-द-जॉब ट्रेनिंग उपलब्ध करून देण्यात येते. • संस्थेमध्ये प्लेसमेंट सेल उपलब्ध आहे. महिला सक्षमीकरणासाठी कौशल्याधारित शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थिनींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. अधिकाधिक विद्यार्थिनींनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी.   डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत…

Read more

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे

पुणे ‘आजच्या तरुण पिढीमध्ये अफाट क्षमता आहे, मात्र मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ते स्वतःची खरी ताकद विसरत आहेत. करिअरच्या शर्यतीत धावताना शारीरिक आणि मानसिक फिटनेस जपला, तरच मोठी स्वप्ने…

Read more

पिंपरी- चिंचवडमध्ये वीज सुविधा सक्षमीकरणस “बूस्टर डोस”‘

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश पिंपरी- चिंचवड  भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती देणारा ऐतिहासिक निर्णय घेत महावितरण प्रशासनाने 291.52 कोटींच्या शहर विकास आराखडा…

Read more

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन 

पिंपरी  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती महानगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली.  महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते यशवंत कण्हेरे,विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Read more