Home पिंपरी चिंचवड पिंपळे निलख येथिल अनधिकृत RMC प्लॅन्टची धुळ दिली पालिका अधिकाऱ्यांना भेट

पिंपळे निलख येथिल अनधिकृत RMC प्लॅन्टची धुळ दिली पालिका अधिकाऱ्यांना भेट

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपळे निलख
 पिंपळे निलख येथील CNG पंपच्या मागे असणाऱ्या ग्रेस्टोंन इन्फ्रा व कार्निवल इन्फ्रा या दोन अनधिकृत RMC प्लॅन्ट असल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागास पत्राद्वारे कळवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने सिल लावलेले असतानाही RMC प्लॅन्ट चालकाने सिल तोडून पुन्हा प्लॅन्ट चालू केला.तरी देखिल पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग गुन्हा दाखल केला नाही. आता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने महावितरण विभागास विद्युत प्रवाह रोखण्यासाठी पत्राद्वारे कळवण्यात आल्यानंतर महावितरण विभागास विद्युत प्रवाह खंडित केला आहे.तरीसुद्धा रस्त्यावर असलेली धुळ कमी होत नाहिये.पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी गांभिर्याने घ्यायला तयार नाहीत त्यामुळे आज आम्ही ड प्रभाग पिंपरी चिंचवड येथिल आरोग्य विभागचे अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त यांना पिंपळे निलख येथिल रस्त्यावर असलेली धुळ पिशवीत भरून भेट स्वरूपात दिली.एवढे करून सुद्धा महापालिका कर्मचारी या प्रकरणी गांभीर्याने पाहणार नसतील तर आम्ही तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा मार्ग पत्करू असा इशारा आपचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी दिला.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00