Home पिंपरी चिंचवड जिंकण्यासाठी जिद्द, धैर्य व चिकाटी असावी – एव्हरेस्टवीर आनंद माळी

जिंकण्यासाठी जिद्द, धैर्य व चिकाटी असावी – एव्हरेस्टवीर आनंद माळी

एसबीपीआयएम च्या ‘युवोत्सव २०२६’ क्रीडा स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी
कोणत्याही स्पर्धेत जिंकण्यासाठी आपल्यामध्ये जिद्द, धैर्य व चिकाटी असावी लागते. त्याला योग्य मार्गदर्शकांची साथ मिळाली की यश नक्की मिळते. सांघिक अथवा वैयक्तिक अशा कोणत्याही खेळात सहभाग घेतल्याने मानसिक, भावनिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते असे मार्गदर्शन ज्येष्ठ क्रीडापटू व एव्हरेस्ट वीर आनंद माळी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट तर्फे ‘युवोत्सव २०२६’ हा तीन दिवसीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या युवोत्सव स्पर्धेत बॉक्स क्रिकेट मुले २० संघ, मुली १२ संघ, हॉलीबॉल २४ संघ, फुटबॉल ३६ संघ आणि आयपीएल ऑक्शन यामध्ये ११ संघांनी भाग घेतला होता. त्यात १००० पेक्षा अधिक विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आनंद माळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एसबीपीआयएम च्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, समन्वयक प्रा. डॉ. अमरीश पद्मा, डॉ. ऋषिकेश कुमार, प्रा. पूर्वा साने आदी उपस्थित होते.
संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राचे महत्त्व सांगताना म्हटले की खेळामुळे नेतृत्वगुण, संघभावना व शिस्त विकसित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :- मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाने इंदिरा महाविद्यालयावर १ धावांनी म्हणजे २० विरुद्ध १९ असा विजय मिळविला.
   मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाने इंदिरा महाविद्यालयावर ७ धावांनी म्हणजे ३५ विरुद्ध २८ असा विजय संपादन केला.
 व्हॉलीबॉल स्पर्धेत पीसीसीओई संघाने एमआयटीएडीटी विद्यापीठावर २-० (२५-२१, २५-२२) असा विजय मिळविला.
 फुटबॉल स्पर्धेत गरवारे महाविद्यालयाने डॉ. डी. वाय. पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, पिंपरी संघावर पेनल्टी शूट आऊटमध्ये ५-४ असा विजय मिळविला. श्री बालाजी युनिव्हर्सिटी संघाला तृतीय क्रमांक मिळाला.
 विद्यार्थी समन्वयक व आयोजन समिती सदस्य प्रशांत सायस, सिद्धेश जामोडे, वैभव वाघेरे, धीरज सोनार, ऋषिकेश मुक्कावर, गायत्री घुले, हर्षदा बाबर, कुणाल निकम व अजय गिट्टे यांनी संयोजनात सहभाग घेतला.
सूत्रसंचालन आर्या सरदेशपांडे, दिया बंसल व श्रावणी कनोरे यांनी केले.
 स्पर्धेतील सर्व विजेत्या संघांना प्रशस्तीपत्र, पारितोषिके बक्षीस देण्यात आली. प्रायोजक व पंचांचा देखील सत्कार करण्यात आला. युवोत्सव मध्ये लकी ड्रॉ मधील प्रथम विजेत्या विद्यार्थ्याला अँड्रॉईड टीव्ही आणि दोन खेळाडूंना स्पीकर्स बक्षीस देण्यात आले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00