Home पुणे जेएनयू’च्या कुलगुरूंची हकालपट्टी करा!

जेएनयू’च्या कुलगुरूंची हकालपट्टी करा!

बहुजन विरोधी मानसिकतेला संरक्षण देऊ नये -डॉ.हुलगेश चलवादी

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

 पुणे

बहुजनांविरोधात गरळ ओकने आज कालची फॅशन झाली आहे. हक्काचे आरक्षण आणि बहुजन विचारधारेला लक्ष करीत चळवळीबद्दल अपप्रचार करण्याचे काम सर्रास सुरु आहे. मात्र, हे प्रकार बहुजनांनी खपवून घेऊ नये. बहुजनांविरोधात गरळ ओकणाऱ्या जेएनयूच्या कुलगुरू शांतिश्री धुलिपुडी पंडित यांची हकालपट्टी करा, अशी मागणी बहुजन नेते, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.४) केले.

कुलगुरू पंडित यांनी एका पॉडकास्टमध्ये जातव्यवस्था आणि ‘पीडित मानसिकता’ यावर वादग्रस्त वक्तव्य केले.या मुलाखतीत त्यांनी दलित समाजाच्या संघर्षांची तुलना अमेरिकेतील कृष्णवर्णीय समुदायाशी करत, ‘सतत स्वतःला पीडित म्हणवून घेऊन प्रगती होत नाही. जसे कृष्णवर्णीयांबाबत झाले, तसेच येथे दलितांबाबत घडले,’ असे विधान केले होते.कुलगुरूंच्या विधानानंतर ‘जेएनयू’ सह बहुजनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

डॉ.चलवादी म्हणाले की, हे विधान ऐतिहासिक जातीय अन्याय आणि सामाजिक विषमतेकडे दुर्लक्ष करणारे आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या आरक्षणासह समतेच्या तरतुदींना कमी लेखण्याचा हा प्रयत्न असून, बहुजन समाजाच्या संघर्षाचा अवमान आहे. अशा मानसिकतेला संरक्षण देणे म्हणजे सामाजिक सलोख्याला तडा देणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुलगुरुंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विद्यार्थी संघटना, प्राध्यापकांनी तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे. हे विधान जातीय अन्यायाकडे दुर्लक्ष करणारे व समतेसाठीच्या विविध तरतुदी अमान्य करणारे असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00