Home पिंपरी चिंचवड पोदार शाळेत वार्षिक कला प्रदर्शन संपन्न 

पोदार शाळेत वार्षिक कला प्रदर्शन संपन्न 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी 
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीला वाव मिळावा या हेतूने  वाकड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक कला महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 या प्रदर्शनास प्रमुख पाहुणे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी उद्घाटन केले.  डेटा लिस्ट माहिती विश्लेषक शिक्षण विभाग स्मिता पांगारे , लोगो आणि ग्राफिक डिझायनर स्वप्ना बालापुरे , दिनकर रणखांबे , तृप्ती कांबळे , ए.के. सिंग,  मुख्याध्यापक ॲग्नेल कार्व्हालो आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी कर्व्हालो म्हणाले कि, एनईपी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पोदार शाळा विद्यार्थ्यांसाठी गेली तीन वर्षांपासून हे प्रदर्शन भरवत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आहे .यावेळी श्री येळे  म्हणाले कि,” पोदार शाळा विद्यार्थ्यांना नुसते शैक्षणिक शिक्षण देत नसून विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ निर्माण करून देत आहे. कलेला व्यवसायिक दृष्टिकोनातून प्राधान्य देण्यात येत आहे. याची आपल्याला प्रचिती आज येत आहे. कला ही केवळ कला नसून तेथे मुलांच्या सर्वांगीण विकासाबरोबर तिचे व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्व आहे.
” या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांची फॅशन डिझाईन रॅम्प वॉक प्रस्तुती होय. विविध कलात्मक संकल्पनांवर कलाकृती सादर करून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने रॅम्पवर चालत उपस्थितांची मने जिंकली.
कला शाखेचे शिक्षक महेश पाटील व त्यांचे इतर सहकारी कु. मृणाली माळी ,कु समीरा भरमगुंडे,  प्रिया सातपुते तसेच अनिता सिंग यांनी विशेष परिश्रम घेतले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00