2
पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 28 च्या संपूर्ण पॅनेलच्या कॅलेंडरचे प्रकाशन आज महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी शहराध्यक्ष योगेश बहल ,अजित गव्हाणे तसेच प्रकाश सोमवंशी उपस्थित होते .पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाना काटे पॅनेल जागा .अ साठी उमेदवार श्री उमेश गणेश काटे ,जागा ब साठी सौ.शितल नाना काटे ,क साठी सौ.मिनाक्षी अनिल काटे आणि जागा ड साठी श्री विठ्ठल उर्फ नाना काटे निवडणूक रिंगणात आहेत .या चारही उमेदवाराचे २०२६ चे नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन मा.ना. अजितदादांच्या हस्ते करण्यात आले.
Please follow and like us:
