Home महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे:  हर्षवर्धन सपकाळ

अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे:  हर्षवर्धन सपकाळ

भेदभाव आणि द्वेषाच्या वातावरणात सौंदळा गावाने एकता, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला.

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

मुंबई

आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारेद्वेषाचेभिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्याधर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेमजिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहेहा आदर्श राज्यात सर्वदूर पोहचला पाहिजेअसे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील जातमुक्त सौंदाळा गावाला भेट देऊन गावकऱ्यांचे अभिनंदन करत संवाद साधला. यावेळी सौंदळ्याचे सरपंच शरद आरगडेमहाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशीसरचिटणीस प्रभावतीताई घोगरेअहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन गुजरउपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटेअभिजीत लुनियाजिल्हा सरचिटणीस रंजन जाधवनेवासा तालुकाध्यक्ष नानासाहेब पठारेमहिला जिल्हाध्यक्ष लताताई डांगेशिर्डीचे शहराध्यक्ष सचिन चौगुलेपाथर्डी तालुकाध्यक्ष नासिर शेख तसेच पदाधिकारीकार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ग्रमस्थांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगाला भिती घालत आहेतयुद्धाची धमकी देत आहे. देशात व राज्यातही भेद निर्माण करणारेभितीचे वातावरण पसरवणारे अनेक प्रवाह आहेत. अशा वातावरणात सौंदाळा गावाने जातमुक्तीचा ठराव करून ‘डरो मत’ चा संदेश दिला आहे. खरे तर जाता जात नाही ती जातधर्म बदलता येतो पण जात बदलता येत नाही. मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा म्हटले की आधी जात लिहावी लागते. आज जातीपातीच्या भिंती अधिक गडद होऊ लागल्या आहेत. बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाली व त्यानंतर सामाजिक वातावरण बिघडले. आपल्याच जातीच्या दुकानातून किराणा घ्याइथपासून किर्तनकारही आपल्याच जातीचा बोलवावा इथपर्यंत हे लोण गेलेअशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन सद्भावना पदयात्रा काढत समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

 

सौंदाळा गावाने एकतासमता आणि बंधुभाव यांचा संदेश देत खूप मोठे पाऊल टाकले असून आज राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंती आहे. गाडगेबाबा हे स्वच्छताअंधश्रद्धा निर्मूलनसामाजिक न्याय आणि मानवतेचे प्रबोधन करणारे थोर संत होते. त्यांच्या विचारांशी पूर्णपणे जुळणारा हा निर्णय म्हणावा लागेल. अज्ञानभेदभाव आणि अस्वच्छतेविरुद्ध लढणाऱ्या गाडगे बाबांच्या मार्गावरच सौंदाळा गाव चालत आहे. गढूळ झालेल्या वातावरणात सौंदाळा गावाने तुरटी फिरवण्याचे काम केले आहे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00