पुणे
पुणे महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पातील शेल्टर असोसिएट्स व इकोसन सर्विसेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, उद्या (दि. २१) रोजी आंबेडकर वसाहत परिसरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रॅली अखिल भारतीय मराठा परिषद संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या सहभागाने आंबेडकर वसाहत परिसरात काढण्यात येणार असून परिसरातील नागरिकांनाही सक्रिय सहभागासाठी आवाहन करण्यात येणार आहे. स्वच्छतेबाबत गाणी, घोषणा व प्रभावी संदेशांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
या रॅलीद्वारे नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन तसेच सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व देखभाल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच कचरा उघड्यावर टाकू नये, स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळावेत तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, याबाबत विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. “स्वच्छ परिसर, निरोगी जीवन आणि नदी संवर्धनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे” हा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.
या प्रसंगी अखिल भारतीय मराठा परिषद संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल शाळेच्या सचिव प्रमिलाताई गायकवाड, मुख्याध्यापक अजित माने, राहुल राठोड (टीम लीडर, शेल्टर असोसिएट्स) तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा उपक्रम पुणे महानगरपालिका मलनि:स्सारण विभाग व सल्लागार संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00