15
पुणे
महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी “स्कॉलरशिप प्रोजेक्ट ऑफ महादेया” ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 13 वर्षांखालील मुले व मुली (जन्मतारीख ०१.०१.२०१२ ते ३१.१२.२०१३) यांच्यासाठी फुटबॉल निवडचाचण्यांचे जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय आयोजन करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा निवड चाचणीसाठी 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती क्रीडापीठ फुटबॉल ग्राउंड, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे सकाळी 7.30 वा. निवडचाणीसाठी उपस्थित रहावे. निवडचाचणी: सकाळी ९.०० वा. प्रारंभ होईल. निवड झालेल्या खेळाडूंना किमान ५ वर्षांचे निवासी प्रशिक्षण मुंबई येथे दिले जाणार असून भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे दत्तक योजनेअंतर्गत सर्व सुविधा पुरवल्या जातील. संपर्कासाठी धीरज मिश्रा, शासकीय क्रीडा मार्गदर्शक – ९२०९३३७७७०, अक्षय चौधरी, पुणे जिल्हा फुटबॉल संघटना प्रतिनिधी – ९४२१०७७५६१, शिरिल आर्शिवादम, संघटना प्रतिनिधी – ९८५०२३६७१७
राज्यस्तरीय होणाऱ्या अंतिम निवडचाचणीतून निवड होणाऱ्या 30 मुले आणि 30 मुलींना 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची अनोखी संधी मिळणार आहे. इच्छुक पात्र खेळाडूंनी https://forms.gle/ 1mwckj3XokoRQbb98 नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी यांनी केले आहे.
Please follow and like us:
