Home पिंपरी चिंचवड मध्यमवर्गाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय’ – आमदार शंकर जगताप

मध्यमवर्गाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय’ – आमदार शंकर जगताप

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष व चिचंवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ वर प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प मध्यमवर्ग, शेतकरी आणि रोजगार निर्मितीला चालना देणारा समावेशक आणि दूरदृष्टीचा असल्याचे सांगितले.

मध्यमवर्गीयांसाठी दिलासा
आमदार शंकर जगताप यांनी प्राप्तिकर मर्यादेत वाढ, टीडीएस सुधारणा आणि ₹१२ लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्नाच्या निर्णयाचे स्वागत करत हा मध्यमवर्गीयांसाठी दिलासा असल्याचे नमूद केले.

शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

शेतकरी आणि महिला कल्याण योजनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत करणार असून, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख रुपये करण्यात आली आहे.

लघु उद्योग आणि रोजगार निर्मितीला गती

लघुउद्योग क्षेत्रात ७.५ कोटी रोजगार निर्मिती होणार असून, MSME ना २० कोटींचे कर्ज आणि स्टार्टअपसाठी क्रेडिट लिमिट २० कोटींवर नेण्यात आली आहे. सूक्ष्म उद्योगांसाठी MSME क्रेडिट गॅरंटी कव्हर ५ कोटींवरून १० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, तसेच पुढील पाच वर्षांत १.५ लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज प्रदान केले जाणार आहे.

वैद्यकीय व शिक्षण क्षेत्राला प्राधान्य

आयटी आणि डिजिटल क्षेत्रातील गुंतवणुकीचे स्वागत करत त्यांनी हे धोरण आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

 AI शिक्षणासाठी ५०० कोटींची तरतूद.

 १०,००० अतिरिक्त वैद्यकीय शिक्षण जागा.

 ८ कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार.

 कर्करोगासह ३६ जीवनरक्षक औषधांवरील कर पूर्णपणे माफ.

 इतर जीवनावश्यक औषधांच्या किंमती कमी होणार.

महाराष्ट्रासाठी विशेष तरतुदी

 एमयुटीपी-३ प्रकल्पासाठी १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी.

 पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटींची तरतूद.

 मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी २३० कोटी रुपयांचा निधी.

 ₹१५,००० कोटींच्या निधीतून १ लाख अपूर्ण घरे पूर्ण केली जाणार.

“या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल आणि देश आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत होईल,” असा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00