78
पिंपरी-चिंचवड
टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ चिंतन समितीच्या मान्यवरांशी आज सु-संवाद झाला. माय-बाय जनतेच्या आशिर्वादाने विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा विजय मिळला. यानिमित्त वारकारी सांप्रदायातील मान्यवरांनी सन्मानही केला. यावेळी जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे, टाळगाव प्रासिदिक दिंडी अध्यक्ष ह.भ.प. रोहिदास मोरे, चिंतन समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर भांगरे, ह.भ.प. अशोक मोरे, ह.भ.प. प्रकाश आहेर, ह.भ.प. सुनील नेवाळे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे मन:पूर्वक आभार.
महाराष्ट्रातील पहिले संतपीठ आपल्या पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आले. आजच्या घडीला सुमारे १ हजार ६०० विद्यार्थी या ज्ञानमंदिरामध्ये अध्यात्म, वारकरी सांप्रदाय आणि आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. उद्याची पिढी सुसंस्कृत घडावी आणि जगाशी स्पर्धा करण्याचे मनोबल शहरातील मुलांना मिळावे. या भावनेतून संतपीठ काम करीत आहे. या शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी पुढाकार घेण्याचे भाग्य आम्हाला मिळाले.
तुकोबा – ज्ञानोबाचा विचार…
नव्या पिढाला मिळतोय ‘‘संस्कार’’!
Please follow and like us:
