चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदार संघातून नवनिर्वाचित झालेले आमदार शंकरशंठ जगताप यांनी भारतीय जनता पार्टीतील अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेवून राज्यात महायुतीला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची जगताप यांनी मुंबईत सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित असलेल्या या अभ्यासू व कुशल नेतृत्वाकडून चिंचवडच्या विकासासाठी मार्गदर्शन व आशीर्वाद घेतला. चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी व जनतेच्या सेवेसाठी झोकून देणार, असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त करत आपली साथ आणि आशीर्वाद यापुढेही असेच राहो अशी आपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, नेते अजितदादा पवार यांचीही मुंबई येथे सदिच्छा भेट शंकर जगताप यांनी घेतली. महाराष्ट्रात भाजपा-महायुतीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल दादांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने काही मुद्द्यांवर चर्चा करताना त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट आमदार शंकर जगताप यांनी घेतली. भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचा संपर्क आणि जनतेसोबत असलेली नाळ यामुळे हा महाविजय प्राप्त झाला.याबद्दल त्यांचे अभिनंदन करत आशीर्वाद घेतले.
चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली, कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणार्या लोककल्याणकारी योजना, आणि महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टीकोन जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे यश मिळाले. यापुढील काळामध्ये देखील आम्ही सर्वजण पक्षाच्या मूल्यांचे पालन करून, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असेल असा आत्मविश्वास शंकर जगताप यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केला.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, चंद्रकांतदादा पाटील यांची कोथरुड मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने निवड झाल्याबद्दल आणि महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुतीच्या विजयाबद्दल शंकर जगताप यांनी भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्राच्या कणखर नेतृत्व राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची आ. जगतापयांनी सदिच्छा भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मला जनसेवेसाठी नक्कीच प्रेरणा देतील. जगाच्या पाठीवर चिंचवड विधानसभा एक विकसित विधानसभा म्हणून ओळखला जावा याच हेतूने मी कार्यरत राहील असा विश्वास पंकजाताईंशी बोलताना शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
माझे आदरणीय मार्गदर्शक, सदैव पाठिशी उभे राहणारे आणि आमच्या कुटुंबासाठी प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगात आधार देणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मुंबई येथे शंकर जगताप यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी आणि समाजासाठी काम करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी नेहमीच सन्मानाची बाब आहे. या भेटीदरम्यान त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कामगिरीबद्दल जगताप यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करताना गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मला सदैव पाठबळ देत राहतील, याची खात्री आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न विचारांमुळे आणि नेतृत्वामुळे विकासाची गती अधिक वेगाने वाढेल असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्याकडून मिळणारे सल्ले आणि प्रेरणा मला नेहमीच अधिक चांगले काम करण्याची ऊर्मी देतात. यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या हितासाठी कार्यरत राहण्याचा दृढ निश्चय जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या रणरागिणी, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची मुंबई येथे शंकर जगताप यांनी भेट घेतली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मिळालेल्या महाविजयामुळे त्यांनी औक्षण करून शंकर जगताप यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी भोसरी विधानसभेचे आमदार श्री.महेशदादा लांडगे यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकारी, मा.नगरसेवक आणि माझे सहकारी उपस्थित होते.
