झील जॉब फेअरमध्ये १३४३ विद्यार्थ्यांना नोकरीचे पत्र 

पुणे
झील एज्युकेशन सोसायटीच्या झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने , आयोजित केलेल्या ‘झील जॉब फेअर २०२६’ मध्ये तब्ब्ल १३४३ विद्यार्थ्यांना नामांकित  कंपन्यांकडून ऑफर लेटर प्राप्त झाली.
 या रोजगार मेळाव्यात  विद्यार्थ्यांनी तब्बल ३५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या भव्य रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील ६७ नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये बजाज ऑटो, टी.ई. कनेक्टिव्हिटी, कमिन्स, ह्युंदाई मोटर्स, टाटा ऑटोकॉम्प, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन, जेएफई शोजी स्टील इंडिया प्रा. लि., सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लि., टॅको एअर इंटरनॅशनल थर्मल सिस्टिम्स प्रा. लि., यशस्वी ग्रुप आदी नामांकित कंपन्यांचा समावेश होता.
झील एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. जयेश काटकर म्हणाले कि,“विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे एवढेच आमचे उद्दिष्ट नसून, त्यांना उद्योगविश्वाच्या अपेक्षांनुसार सक्षम बनवून उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हीदेखील आमची महत्त्वाची जबाबदारी आहे.
झील एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रा. उद्धव शिद यांनी सांगितले, “उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी अशा रोजगार मेळाव्यांची अत्यंत आवश्यकता आहे.
झील सेंट्रल प्लेसमेंट सेलचे डीन  डॉ. जितेंद्र खुबानी म्हणाले कि , “झील जॉब फेअर २०२६ चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना विविध उद्योगांतील रोजगाराच्या अधिकाधिक संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणे हा होता.
Please follow and like us:

Related posts

‘टेक फॉर गुड’ ही परिषद डिजिटल युगात दिशादर्शक – डॉ. सुधीर कुमार मारवा 

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा उत्साहात संपन्न

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर