स्वच्छतागृह धोरणात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा समावेश करा – गिरिजादेवी कुदळे 

पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अजय सूर्यवंशी यांनी “सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण” तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये महिलांसाठी योग्य ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित आणि स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावेत अशी मागणी माजी नगरसेविका व शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरीजादेवी प्रवीण कुदळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
 कुदळे यांनी आयुक्त सुर्यवंशी यांना बुधवारी पत्र दिले या पत्रात पुढे म्हटले आहे की, सुमारे ३० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न कायमच दुर्लक्षित राहिला आहे. नवीन सार्वजनिक स्वच्छतागृह धोरणामध्ये महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या सार्वजनिक व सुरक्षित ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याचा समावेश करावा. यामध्ये स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित, “इ – टॉयलेट” उपलब्ध करून द्यावेत. या ठिकाणी नियमित स्वच्छता, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, हात धुण्यासाठी पाणी, पेपर नॅपकिन उपलब्ध करून द्यावेत. तसेच तेथे २४ तास प्रकाश व्यवस्था, महिला स्वच्छता कर्मचारी व महिला सुरक्षा रक्षक नेमावेत. लहान बाळांसाठी चेंजिंग रूम, सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग आणि डिस्पोजल मशीन अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशीही मागणी केली आहे. तसेच यापूर्वी अनावश्यक व असुरक्षित ठिकाणी महिलांसाठी स्वच्छता गृह उभारले आहेत त्याचा आढावा घ्यावा
Please follow and like us:

Related posts

‘टेक फॉर गुड’ ही परिषद डिजिटल युगात दिशादर्शक – डॉ. सुधीर कुमार मारवा 

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा उत्साहात संपन्न

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर