संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा उत्साहात संपन्न

पिंपरी

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘मोगरा फुलला’ हा भक्तिमय संगीत सोहळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

बुधवारदि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माउलींच्या अभंगओव्याअध्यात्मिक विचार आणि भक्तिपरंपरेचा सुरेल जागर करण्यात आला. डॉ. गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचे साहित्यअध्यात्म आणि भक्तिपरंपरा यावर प्रभावी व्याख्यानातून मार्गदर्शन केले. प्रसिद्ध गायिका सौ. सन्मिता शिंदे यांच्या सुमधुर स्वरातून ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग व ओव्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण सभागृह भक्तिरसात चिंब भिजून गेले.

मोगरा फुलला’ या उपक्रमाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतमय साहित्याचात्यांच्या अध्यात्मिक विचारांचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा जागर करण्यात आला. ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग-ओव्यांमधील भक्तीज्ञानअध्यात्म आणि मानवतावादी विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम ठरला.

या कार्यक्रमास नगरसेवक संदीप वाघेरेमाजी आमदार विलास लांडेविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरस्थायी समिती सदस्या सुलभाताई उबाळेस्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळेप्रियांका कुदळेअरुणा लंगोटेराजू बनसोडेविराज लांडेअनंत कोऱ्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रशेखर अहिररावजितेंद्र वाटकरकिरण शिंदेगणेश मंजाळराघवेंद्र भांडगे आणि कैलास वाघेरे यांनी परिश्रम घेतले.

संत ज्ञानेश्वर माउलींच्या विचारांचा आणि भक्तिपरंपरेचा सुरेल आविष्कार घडविणारा ‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारा ठरला. भक्तिमय वातावरणदर्जेदार व्याख्यान आणि सुमधुर गायन यामुळे हा सोहळा उपस्थित रसिकांच्या कायम स्मरणात राहीलअशी भावना आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Please follow and like us:

Related posts

‘टेक फॉर गुड’ ही परिषद डिजिटल युगात दिशादर्शक – डॉ. सुधीर कुमार मारवा 

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या नाकखाली १०४ वर्ष जुन्या ५२ वृक्षांची क्रूर कत्तल; उद्यान विभागाच्या भूमिकेवर गंभीर शंका- आप ऋषिकेश कानवटे