Home पिंपरी चिंचवड चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आ. शंकर जगताप

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आ. शंकर जगताप

क"दर्जा पर्यटन विशेष निधीमधून श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून भाविकांना मिळणार उत्तम दर्जाच्या सुविधा

पिंपरी चिंचवड 

चिंचवड देवस्थान ट्रस्टने कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे. सेवा कार्याला धार्मिक अनुष्ठानाची जोड देत  समाजात एक आदर्श कायमच स्थापित ठेवला. आरोग्य, स्वच्छता, अनेक सामाजिक कार्यातून मानवतावादी दृष्टिकोन राखला. ज्यातून अनेक प्रकारचे मापदंड प्रस्थापित झाले. आगामी काळात हे आदर्शवत कार्य महाराष्ट्राच्या बाहेरही सर्वदूर पोहोचावे यासाठी देवस्थानला “ब” दर्जा पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. भविष्यात जास्तीत जास्त निधी देवस्थानला मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. भाविकांना त्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळतील असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

“क”दर्जा पर्यटन विशेष निधी मधून
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा चिंचवड येथे मंदिराच्या प्रांगणात गुरुवारी पार पडला. यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेवक सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका मनीषा चिंचवडे, आशा सूर्यवंशी, मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र महाराज देव, विक्रम दौंडकर  तसेच आजी माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले,
श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांचे नाव महाराष्ट्रात सर्वदूर परिचित आहे. हिंदू धर्मात पाच मुख्य संप्रदाय आहेत. सूर्योपासक, शैव, वैष्णव, गाणपत्य आणि शाक्त. यातील ‘गाणपत्य’ संप्रदाय हा गणपतीलाच मूळ परब्रह्म मानतो. या संप्रदायाच्या गौरवशाली इतिहासातील एक अग्रणी आणि देदीप्यमान ऋषी म्हणजे चिंचवडचे परमपूज्य श्री मोरया गोसावी. म्हणूनच चिंचवडचे मोरया गोसावींचे स्थान, महाराष्ट्रातील गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ म्हणून अत्यंत आदराने घेतले जाते.  अशा परम पवित्र देवस्थान आणि मोरया गोसावींच्या चरणी सेवा रुजू करण्याचे संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

पंतप्रधान नरेंद्र जी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस  यांच्या माध्यमातून आपल्या देशाची परंपरा, धार्मिक अनुष्ठान कायम राखण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. जगन्नाथ कॅरिडोर, अयोध्या राम लल्ला मंदिर असेल यातून आपल्या परंपरा जतन करण्याचे काम भाजपच्या माध्यमातून झाले आहे. २०२२ मध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी या देवस्थानला “क” दर्जा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले. यानंतर लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून , माजी आमदार अश्विनी जगताप यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला. आता मला निधी आणण्याची संधी मोरया गोसावी यांच्या आशीर्वादाने मिळाली या पुढील काळातही देवस्थानची प्रगती, भाविकांना सुविधा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. भविष्यात हे देवस्थान “ब ” दर्जा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शंकर जगताप म्हणाले.

दरम्यान  आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पवना नदीची आरती करून नदी स्वच्छतेची शपथ यावेळी घेण्यात आली.

जितेंद्र महाराज देव यावेळी म्हणाले, “मोरयाचा धर्म जागवण्या”चे काम आमदार शंकर जगताप यांच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्ट अधिक वेगाने करत आहे. २०२२ मध्ये या देवस्थानला “क” पर्यटन दर्जा प्राप्त झाला.  मात्र त्यानंतर पाठपुरावा आणि निधी मिळवण्याचे काम आमदार जगताप यांच्या प्रयत्नांमुळे तडीस गेले.

या कामांसाठी २ कोटी ५० लाखांचा निधी

मंदिर परिसर व मंगलमुर्ती वाडा परिसर सुशोभीकरण करणे ( २५ लक्ष),  पादुकामंदिर, सभा मंडप, संरक्षण भिंत उभारणे (५० लक्ष),  मुख्य प्रवेशद्वार जतन संवर्धन व दर्जा वाढ करणे (२५ लक्ष),  पेव्हिग ब्लॉक, दगडी टप्पा, स्टेनलेस स्टील रेलिंग, चुन्याची पॉइलिंग, सोलिंग, मुरूम फिटिंग( ५० लक्ष),   अत्याधुनिक स्वच्छतागृह बांधणे (१५ लक्ष), पाण्याची टाकी बांधणे (२५ लक्ष), अन्नदानासाठी छत्र बांधणे (२५ लक्ष), भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था करणे (१० लक्ष),
मंदिर परिसरात सभोवतीच्या पटांगणामध्ये दगडी पायऱ्यांचे बांधकाम करणे (२५ लक्ष) या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी २ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

श्रीमन् महासाधू मोरया गोसावी मंदिर परिसरात होणार असलेली ही विकासकामे केवळ भौतिक स्वरूपातील नसून, ती श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेला पुढील पिढीपर्यंत घेऊन जाणारी आहेत. महासाधू मोरया गोसावी महाराजांनी दिलेल्या मूल्यांवर आधारित सेवा, समर्पण आणि सामाजिक ऐक्य या भावनेतूनच हा विकास घडत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली हे कार्य आकार घेत असून, शासन–प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाविक यांच्या संयुक्त प्रयत्नातून मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. या विकासकामांमुळे केवळ पायाभूत सुविधा सक्षम होणार नाहीत, तर आध्यात्मिक चेतना अधिक दृढ होऊन समाजात सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00