14
पिंपरी
स्पाईन सिटी रोड लगत असलेल्या कल्चर क्रेस्ट सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास जोशी, सचिव राजेश घुंगार्डे तर खजिनदार कुणाल तोडकर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रहिवाशी अनिल सौंदाडे आणि विजय तोडकर यांनी सहकारी संस्था उपनिबंधक दापोडी यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून विद्यमान कार्यकारणी बरखास्त करीत असल्याचे उपनिबंधक मुकुंद पवार यांनी निर्देश देऊन संस्थेवर प्रशासक म्हणून बाळकृष्ण घुगे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ५८ अन्वये संस्थेच्या समितीमधील एकूण पाच सदस्य महेंद्रकर प्रशांत, जयेश ढमाले, दिगंबर वाडेकर ,अजिंक्य मारूडवार आणि डॉ. शैलजा माने यांना अगोदरच संस्थेच्या नियमित सभांना हजर न राहणे, निर्णय प्रक्रियेत सहभाग न नोंदविणे , व दैनंदिन कामकाजात लक्ष न देणे , यामुळे पदावरून अगोदरच पद्च्चूत करून सदस्यत्व रद्द केले होते. त्या नंतर संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनातील त्रुटी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार याला कंटाळून डॉ. दत्तात्रय खुणे आणि धनंजय गावडे यांनी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा सप्टेंबर २०२५ रोजी दिला होता .
अर्जदार यांच्या अर्जास अनुसरून प्रथम दर्शनी संस्थेच्या उपविधीनुसार आवश्यक ती गणसंख्या ७ पूर्ण होत नसल्याने संस्था कायदा ,नियम व उपविधी यांच्यातील तरतुदीनुसार कोणताही निर्णय घेऊ शकत नसल्याने , संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे मा. उपनिबंधक यांच्या निदर्शनास आणून दिल्या मुळे कलम ७७ अ (फ )(दोन) तरतुदी नुसार त्वरित कारवाई करून प्रशासकाची नेमणूक केली आहे.
Please follow and like us:
