Home पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा शब्द अखेर खरा ठरला..!

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा शब्द अखेर खरा ठरला..!

 पिंपरी-चिंचवड महापौरपदावर भाजपाचाच झेंडा

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

 रवि लांडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित

पिंपरी-चिंचवड

“पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महापौर भाजपचाच असेल,” असा ठाम विश्वास भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला होता आणि अखेर तो प्रत्यक्षात उतरला आहे. भाजपकडून महापौरपदासाठी रवि लांडगे तर उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा महापौर निश्चित झाला आहे. तसेच, शर्मिला बाबर यांचाही निवड निश्चित मानली जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी रवी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी भाजपाचे नेते आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, ज्येष्ठ नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका नम्रता लोंढे, ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अभिषेक बारणे, माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुमारे आठ महिन्यांपूर्वी शत्रुघ्न काटे यांनी भाजप शहराध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला आणि पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी शहरात करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम थेट महापालिका निवडणुकीच्या निकालात दिसून आला. दरम्यान, अल्पावधीत शहर संघटन मजबूत करत निवडणुकीत भाजपला यश मिळवून देणारे नेतृत्व म्हणून शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा होत आहे.

शत्रुघ्न काटे यांचे पुन्हा ‘‘समर्पण’’…
वास्तविक, महापौरपदासाठी तीव्र इच्छुक असलेले शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे, 2017 मध्ये निवडून आल्यानंतर त्यांना महत्त्वाच्या पदावर संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना पदापासून वंचित ठेवण्यात आले. विधानसभा निवडणुकीत इच्छुक असताना त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. समर्पित भावनेतून काम करणारे शत्रुघ्न काटे भाजपासाठी पुन्हा एकदा ‘‘किंगमेकर’’ ठरले आहेत. भाजपने महापालिका निवडणुकीत शहरात एकहाती सत्ता मिळवत नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महापौरपदावर भाजपचाच उमेदवार विराजमान होणार, हे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ठामपणे सांगितले होते. आज उमेदवारी अर्ज दाखल होताच काटे यांचे शब्द खरे ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरात आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पाणीपुरवठा आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे. हा विकासाचा वेग कायम ठेवण्याची जबाबदारी महापालिका सभागृह पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक नागरिकासाठी विकासाची गाडी थांबणार नाही. महापालिका सभागृहातून घेतले जाणारे निर्णय प्रगतीला दिशा देतील आणि आमच्या नगरसेवकांच्या जबाबदारीने शहराचा सर्वांगीण विकास सुनिश्चित होईल. मी महापौरपदासाठी इच्छुक होतो. मात्र, संधी मिळाली नाही म्हणून नाराज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोपवलेली शहराध्यक्षपदाची जबाबदारी आणि भूमिका सक्षमपणे पार पडणार आहे. समर्पण भावनेतून काम करणे हीच भाजपाची शिकवण आहे.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00