रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, विश्वराज रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय, आधार ब्लड बँक, वायसीएम रुग्णालय, औंध ब्लड बँक, केईएम रुग्णालय या सर्व रक्तपेढ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. माजी आमदार अनिल भोसले यांचे कार्यालय, छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्थानक, विष्णुकृपा नगर, पीएमसी कॉलनी बुद्ध विहार, मुळा रोड बसस्थानकाच्या मागे, पाटील इस्टेट वसाहत उड्डाणपुलाखाली, खैरेवाडी गणपती मंदिर येथे एकाच वेळी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली, अशी माहिती माजी नगरसेविका रेश्मा अनिल भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली. या उपक्रमास रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे राम बांगड यांचे मार्गदर्शन लाभले. मा. नगरसेविका रेश्माताई अनिल भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले.
न. ता. वाडी सर्व ग्रामस्थ मित्र परिवार, वीर चाफेकर तरुण मित्र मंडळ व खैरेवाडी ग्रामस्थ, छ. शिवाजीनगर रेल्वेस्टेशन तरुण मंडळ, विष्णुकृपा तरुण मंडळ, अखिल छ. संभाजीनगर गणेशोत्सव मित्र मंडळ, पी.एम.सी कॅालनी, मुळारोड भागातील सर्व गणेश मंडळे व रहिवासी सोसायटी, पाटील ईस्टेट व महात्मा गांधी रहिवाशी मित्र परिवार या सर्वांनी उभा उपक्रमात सहभाग नोंदवला
