16
पुणे
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज पहाटे पुण्यात शनिवार पेठ परिसरातील तानपुरा मेट्रो पुल आणि विविध विकासकामांची पाहणी केली. नव्यानं बांधण्यात आलेल्या तानपुरा पुलासह सुरू असलेल्या दुसऱ्या पुलाच्या कामाचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. नागरिकांनी नदी परिसर स्वच्छतेसंदर्भात मांडलेल्या सूचनांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
त्याचबरोबर कुंजीर चौक, पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक आणि रस्ते समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. अतिक्रमण, अव्यवस्थित पार्किंग व महावितरण संबंधित तक्रारींबाबत तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांना तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
Please follow and like us:
